७/२/२०१९
सत्र ९- आदिती परबपुस्तक - The Kite Runner
लेखक - Khaled Hosseini
काइट रनर हे निरपेक्ष प्रेम, निष्ठा आणि विश्वासघात अशा संमिश्र घटनांबद्दल आहे. हे पुस्तक पिता-पुत्रामधील नाते आणि दोन भिन्न वंशातील लोकांचे बंधुत्वाचे नाते उलगडून दाखवते. एकेकाळी समृद्ध देश असलेल्या अफगाणिस्तानचे आता हिंसाचार, मृत्यू आणि गरिबीने ग्रासलेला देश असे झालेले संक्रमण पाहून मन विषण्ण होऊन जाते. या कथेचा नायक आहे अमीर! त्याचे जीवन त्याने केलेल्या एका निवडीमुळे आणि त्याच्या जन्मभूमीच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे आमूलाग्र बदलते.
"हे अयोग्य असू शकते, परंतु काही दिवसात जे घडते, काहीवेळा एक दिवसही, संपूर्ण आयुष्यभर बदलू शकते." -
खालेद हुसैनी
No comments:
Post a Comment