मंडळी बऱ्याचदा युद्धस्य कथा रम्या' असं म्हटलं जातं. पण बरोबरीनेच किंबहुना काकणभर जास्तीच गुन्हे- गुन्हेगार शोध आणि गुन्हे अन्वेषण हे अधिक लोकप्रिय विषय! गुन्हा अन्वेषण - यामध्ये सर्वात उत्तुंग नाव शेरलॉक होम्स चे. शेरलॉक होम्स हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती त्रिखंडात मिळणं मुश्किल ! अर्थात देशोदेशीच्या लोकांना अगदी ज्यांनी होम्स वाचला नसेल तरी त्यांनाही, ही व्यक्तिरेखा ऐकून माहीती असेलच. होम्सची व्यक्तिरेखा आणि व्यक्तित्व - कथा वैशिष्ट्य यावर आजचं सत्र होणार आहे. आणि विशेष म्हणजे साहित्याच्या , कलेच्या अनेक प्रांतांचा ज्यांचा दांडगा अभ्यास आहे, जे चांगले वाचक आणि श्रोते आहेत असे मुकुंदराव करकरे हे सत्र घेतायत. शेरलॉक होम्स विषयी रंजक गोष्टी ऐकायला नक्की या आजच्या शब्दांगण च्या सत्रात...
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment