सत्र १२७ – मंगला चौधरी
विषय- योग : जीवन जगण्याची कला
गेली काही वर्षं आंतरराष्ट्रीय दिनविशेषांमध्ये एका महत्त्वाच्या दिनविशेषाची भर पडली आहे. तो म्हणजे २१ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस. आपल्या पंतप्रधानांपासून अगदी प्राथमिक शाळेतल्या मुलांपर्यंत लोक उत्साहाने विविध योगासनांचा सराव करतात. मात्र आसन हे योगशास्त्राच्या अष्टांगांपैकी एक अंग. अष्टांग योगाच्या इतर अंगांशी सामान्य माणसाचा फारसा परिचय नसतो. मात्र आसनांबरोबरच इतर अंगांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनात केला..तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात योगशास्त्राच्या मदतीने आपण एक तणावरहित आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. म्हणूनच योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शब्दांगणचं १२७वं सत्र याच विषयावर होणार आहे आणि वक्त्या आहेत मंगलाताई चौधरी.
तेव्हा जीवन जगण्याच्या या कलेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा!
No comments:
Post a Comment