Wednesday, December 8, 2021

सत्र ६३ - हेरंब ओक - वाचत सुटलो त्याची गोष्ट - निरंजन घाटे

१९-०३-२०२०

सत्र ६३- हेरंब ओक 

पुस्तक- वाचत सुटलो त्याची गोष्ट 

लेखक - निरंजन घाटे

वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणं आहे असं मला वाटतं. वाचनातून आपल्या जग कळतं. जगाचा इतिहास-भूगोल कळतो, संस्कृती कळते. जगाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. जग आपल्यापरीने घडवणारी माणसं कळतात. त्यातले वाद-प्रतिवाद कळतात. जग नावाच्या गोष्टीचा वेगळाच आवाका येतो. माझा अभ्यासविषय नसलेल्या एखाद्या भलत्याच क्षेत्रातल्या खाचाखोचा मला माहिती असतात, हे पाहिलं की अनेकदा त्या विषयातले तज्ज्ञही चाट पडतात. ही आत्मप्रौढी नव्हे; तर केवळ वाचनामुळे आयुष्यात आनंद कसा अनुभवता येतो, हे मला सांगायचंय. वाचनाचा हा माझा प्रवास आणि त्यातून हाती लागलेला खजिना वाचकांसमोर मांडला तर त्यांनाही हा आनंद घेता येईल, या विचाराने मी हे पुस्तक लिहायला घेतलं.

दुसरं असं, की माझे स्नेही मला नेहमी विचारतात, “तू एवढं केव्हा आणि कसं वाचतोस?” जुजबी ओळख असलेल्यांना माझ्या घरात एवढी पुस्तकं कशी याचं आश्‍चर्य वाटतं. या प्रश्‍नावर मी खास असं स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. पण दिवसभरात काही वाचलं नाही तर मला अस्वस्थ व्हायला होतं, म्हणून मी वाचतो. अगदी आजारपणाने अंथरुण धरलेलं असलं तरी पडल्या पडल्या काही तरी वाचल्याखेरीज मला बरं वाटत नाही. बर्‍याचदा मला असंही विचारलं जातं, की तुम्हाला एवढं सगळं वाचायला वेळ कसा मिळतो? त्यावर माझं उत्तर असतं, दारूड्याला जसा दारू प्यायला वेळ मिळतो तसा मला वाचायला वेळ मिळतो. हे ऐकून समोरच्या व्यक्तीला मी त्याची चेष्टा करतोय असं वाटतं, पण ते खरं आहे.

-निरंजन घाटे

(वाचत सुटलो त्याची गोष्ट)

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...