Wednesday, December 8, 2021

सत्र ६१- श्री. मनीष टिळक - हास्य व्यंग कविता : एक रसास्वाद

५/३/२०२० 

सत्र ६१ - श्री. मनीष टिळक 

विषय - हास्य- व्यंग कविता : एक रसास्वाद 


निदा फाजलींचा एक दोहा आहे. 

युग युग से हर बाग का यही एक उसूल
जिसको हसना आ गया वो ही मिट्टी फूल ! 


आज हा दोहा आठवण्याचं कारण म्हणजे आजचं मनिष टिळक यांचं शब्दांगणचं  एकसष्ठाव्व सत्रं. नशिबाने आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि आपलं माणूसपण जपण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे हास्य विनोद. आपल्या सुसंस्कृततेचे एक परिमाण म्हणजे आपली निर्व्याज हसण्याची क्षमता. दूरदर्शनवर चालू असलेल्या कमरेखालच्या विनोदांमधून दिसणारी संस्कृती इथे अर्थातच अपेक्षित नाही. पण जीवनात दिसणारं व्यंग / विसंगती कवितांच्या माध्यमातून समोर मांडले जातात. या विसंगतीतून विनोद निर्मिती करणारे कवी अवलियाच म्हटले पाहिजेत. अशाच हास्य कवितांचा रसास्वाद आजच्या सत्रात मनिष टिळक घेतायत हे सत्र अर्थात चुकवू नये.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...