२१-११-२०१९
सत्र ४६- लेखक - वाचक सत्र
पुस्तक- होऊन जाईल
लेखक - आनंद वामनसे
वाचक सादरकर्ते - विनोद जाधव
शब्दांगण ही एक प्रयोगशाळाच आहे म्हणा ना. आज शब्दांगण मध्ये वाचक - सादरकर्ता आहे विनोद जाधव. पुस्तक आहे 'होऊन जाईल'. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच प्रचंड पॉझिटिव्ह असणारे या पुस्तकाचे लेखक आनंद वामनसे, सुद्धा सत्रासाठी शब्दांगण ला उपस्थित आहेत. आपले पुस्तक वाचून वाचकाला काय वाटतंय हे ऐकणं अर्थातच कुठल्याही लेखकाला आवडतच तसंच वाचकालाही लेखकाला काय म्हणायचंय हे ऐकायला आवडतं. म्हणूनच आजचा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग. विनोद जाधव आणि आनंद वामनसे ही काही जोडगोळी नाही. किंबहुना आनंदला विनोद माहिती ही नाही. विनोद, काही वाचक,म्हणूनही प्रसिद्ध नाही. पण भावलं म्हणून या पुस्तकाबद्दल बोलणार आहे विनोद. आणि केवळ अंतरीचा जिव्हाळा म्हणून काहीजण तरी, फक्त विनोद बोलणार आहे म्हणून आलेले आहेत. सगळ्यांनीच यानिमित्ताने एका वेगळ्या पुस्तकाचा आणि वेगळ्या प्रकारच्या चर्चेचा अनुभव घेतला.
No comments:
Post a Comment