Thursday, June 23, 2022

सत्र १७८ : योग - एक वेगळा दृष्टिकोन : डॉ. नितीन पाटणकर

२३।०६।२०२२

सत्र १७८ वे:

विषय : योग - एक वेगळा दृष्टिकोन

सादरकर्ते : डॉ. नितीन पाटणकर



मंडळी, आजचं शब्दांगण अतिशय खास. नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. त्या निमित्ताने आजचे सत्र ज्युपिटर हॉस्पिटलशी संलग्न असलेले डॉ. नितीन पाटणकर घेत आहेत. खूप वेळेस आपण योग या विषयाबद्दल ऐकताना किंवा बोलताना प्रामुख्यानं यम नियमांबद्दल ऐकतो. अर्थात भारतीय व्यवस्थेत मुळापासून प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीतला यम नियम हा महत्वाचा भाग. परंतु 'योग' कडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आज डॉ. नितीन पाटणकर मांडणार आहेत. ओबेसिटी, जीवन पद्धतीमुळे निर्माण झालेले आजार परतवण्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. नितीन पाटणकर आजचं सत्र घेतायत.  ,संवादक आणि निष्णात डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेतच योग एक निराळा दृष्टीकोन या विषयावरचे त्यांचे सत्र ऐकण्यासाठी आज ऑनलाईन अथवा ऑफलाईन नक्की उपस्थित राहा. 


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र १७७ : सृजनाच्या नव्या वाटा - रेणू दांडेकर : रिद्धी करकरे

 १६।०६।२०२२

सत्र १७७ वे:

पुस्तक : सृजनाच्या नव्या वाटा

लेखिका : रेणू दांडेकर

सादरकर्त्या : रिद्धी करकरे


शिक्षण हा कुठल्याही देशाच्या / समाजाच्या दृष्टीने महत्वाचा विषय. पश्चिमेकडे प्लेटो पासून ते आपल्याकडे चाणक्यापर्यंत प्रत्येकानेच शिक्षण हे माणूस घडवण्यासाठी महत्वाचे मानले. आजही काहींना आपल्याला हवी तशीच नवी पिढी घडवण्याची इच्छा आहे. जणू मुले म्हणजे काही प्रॉडक्टच आहे... अशा वेळेस काही शाळा मात्र मुळातुन वेगळा दृष्टिकोन ठेवून मुलांच्या व्यक्तित्वाचं विकसन कसं होईल यावर प्रयोग करतायत... आजचं शब्दांगणचं सत्र रेणू दांडेकरांच्या सृजनाच्या नव्या वाटा यावर रिद्धी करकरे घेतेय. नर्म पण मार्मिक बोलण्याची हातोटी असलेली रिद्धी या विषयावर काय बोलणार?  सृजनाच्या नक्की कोणत्या नव्या वाटा  आपल्यासमोर उलगडल्या जातील याची उत्सुकता आहेच.. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, June 10, 2022

सत्र १७६ : मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - पु. ल. देशपांडे : शौनक पिंपुटकर

०९।०६।२०२२

सत्र १७६ वे:

पुस्तक : मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास

लेखक : पु.ल.देशपांडे

सादरकर्ते : शौनक पिंपुटकर



मंडळी, १२ जून हा पुलंचा स्मृती दिन, या निमित्ताने आजचं सत्र होतंय. मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या धम्माल पुस्तकावर पुलंचा एका अर्थाने भक्तच असलेला शौनक पिंपुटकर आजचं सत्र घेतोय. आपल्यापैकी अनेकजणांनी विशेषतः नव्या पिढीने पुलंचं कथाकथन ऐकलं असेल..आणि त्यामुळे बिगरी ते मॅट्रिक, म्हैस, अंतू बर्वा इत्यादी आपल्या अत्यंत परिचयाचे किंबहुना जिव्हाळ्याचेच. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा पुलंची ठायी ठायी आठवण येतेच. आजचं सत्र एका प्रसिद्ध पण न 'ऐकलेल्या' पुस्तकाविषयी आहे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Thursday, June 2, 2022

सत्र १७५ : मराठेशाहीतील असामान्य पर्व - नानासाहेब पेशवे : कौस्तुभ कस्तुरे

 ०२।०६।२०२२

सत्र १७५ वे:

विषय : मराठेशाहीतील असामान्य पर्व : नानासाहेब पेशवे

सादरकर्ते : कौस्तुभ कस्तुरे



मंडळी, शब्दांगण चे १७५ वे सत्र आज संपन्न होतंय. आम्हा सगळ्यांसाठीच हा आनंदाचा क्षण.. अर्थात आजचे सत्र हे १७५ वे म्हणून जेवढे विशेष त्यापेक्षाही विषय आणि वक्ता म्हणून सुद्धा. तरुण इतिहासकार कौस्तुभ कस्तुरे यांचे सत्र ते ही नानासाहेब पेशव्यांवर होणार आहे. पेशवाई - ब्राह्मणशाही हा वृथा वाद महाराष्ट्राला भेडसावत असतोच पण त्यापेक्षाही मराठेशाहीचे आजचा स्वतंत्र भारत घडवण्यामध्ये भरीव योगदान आहे. मराठेशाहीतले एक सोनेरी पान म्हणजे नानासाहेब पेशवे. आजच्या सत्राच्या निमित्ताने या असामान्य नेतृत्वावर प्रकाश टाकला जातोय... ऑनलाईन अथवा ऑफलाईन या सत्राला अवश्य जॉईन व्हा...      


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !





या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सत्राची काही क्षणचित्रे -






सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...