१७ ऑक्टोबर २०१९
सत्र ४१, ४२ - कवी डॉ. जितेंद्र पेंढारकर
विषय - कवितांचे गाव
याच साठी केला होता अट्टाहास ! असं म्हणावं की काय, असं हे शब्दांगणचं सत्रं. 'कवितेचं गाव' या पुस्तकाचे कवी जितेंद्र पेंढारकर यांचं. याचं सरळ सोपं कारण म्हणजे आज जितेंद्रजी निव्वळ कविता वाचून नाही दाखवणार किंवा केवळ आपल्या कवितांचं रसग्रहण करणार नाहीत, तर ते कविता - कवितेचा आकृतिबंध, ती वृत्तात बांधणं सोपं असतं कि अवघड.... वृत्त तरी किती प्रकारची आणि हो सर्वसामान्यपणे आपण ज्या फॉर्म मध्ये कविता लिहितो - मुक्तछंद - तो मुक्तछंद म्हणजे तरी नेमकं काय.. अशा तांत्रिक बाजूंवर भाष्य करत करत ते कवितेच्या गावी घेऊन जाणारेत आपल्याला... शब्दांगणच्या समूहावर त्यांच्या काही कविता पाठवल्या होत्याच या आधी... पण या सत्राच्या निमित्ताने कवी / कवयित्रींसाठी एक छोटीशी कार्यशाळाच होणार आहे म्हणा ना.... बरोबरीने नवकवींसाठी कवितेचा एप्रिसिएशन कोर्स सुद्धा कविता जगणारे जितेंद्रजी जगण्यातली कविता सहज बोलता बोलता उलगडून दाखवणारेत... शब्दांगणच्या मागच्या एका सत्राच्या शेवटी एक वक्ता सहजंच म्हणाला होता - 'कविता - तो काही माझा प्रांत नाही बुआ' अर्थात तो हे गमतीने म्हणाला असला तरी शब्दांगणच्या श्रोत्यांसाठी आज एक पर्वणी आहे... आपल्यातला कवी जागवण्याची, कविता हा साहित्यप्रकार म्हणून खऱ्या अर्थाने ओळखण्याची.
No comments:
Post a Comment