Wednesday, December 21, 2022

सत्र २०१ : ...आणि श्रीकृष्ण : प्रसाद वडके

१५।१२।२०२२

सत्र २०१वे:

विषय : ...आणि श्रीकृष्ण

सादरकर्ते : प्रसाद वडके



मंडळी, आजचं शब्दांगणचं सत्र आणखी वेगळं... आजवर आपण श्रीकृष्ण ऐकला असेल तो निदान मध्यमवयीन माणसांकडून, प्रवचनकारांकडून किंवा भागवत कथेच्या वगैरे माध्यमातून... तुमच्या माझ्या जीवनाला वेढून राहीलेला श्रीकृष्ण आपण आज ऐकणार आहोत युवा वक्ते प्रसाद वडके यांच्याकडून. अर्थात विनम्र पण तरुण तडफदार वक्ता म्हणून प्रसाद वडकेंचा आपल्याला परिचय आहेच. 

यशोदेचा कृष्ण, राधेचा कृष्ण, गोपींचा आणि गोपाळांचा कृष्ण, कंसाचा वध करणारा कृष्ण, द्रौपदीचा सखा, शिष्टाई करणारा कृष्ण, जरासंधाला यमसदनी पाठवणारा कृष्ण आणि, यतो धर्म: तथो जय: असं उच्चरवाने सांगणारा सुद्धा कृष्णच... एक ना दोन किती रूपे, आणि तरीही कृष्ण संपूर्ण आत्मसात होत नाहीच ... तो उरतोच.... 

आजच्या '.... आणि श्रीकृष्ण' या सत्रातून प्रसाद काय मांडतो याविषयी खूपच औत्सुक्य आहे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २०० : बदलता भारत : चन्द्रशेखर टिळक

०८।१२।२०२२

सत्र २०० वे: (द्विशतक महोत्सवी सत्र)

विषय : बदलता भारत

सादरकर्ते : चन्द्रशेखर टिळक



मैं अकेला ही चला था जानिब ए मंझिल मगर

लोग साथ आते गये, कारवा बनता गया!

5-6 जणांनी मिळून शब्दांगण ची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा असं वाटलं ही नव्हतं की 4 वर्ष ही सत्रे चालू राहतील.... पण आपण सगळ्यांनी शब्दांगण उचलून धरलेत आणि त्याला विशिष्ट उंची प्राप्त करून दिलीत. हे श्रेय आमचे नाही याची आम्हा सर्वांनाच विनम्र जाणीव आहे! पण आजचं सत्र अनेक अंगांनी विशेष. सिद्धहस्त वक्ते श्री. चन्द्रशेखर टिळक घेणार आहेत. बदलता भारत त्यांच्या चष्म्यातून बघणं हाच एक अनुभव असेल. त्यात आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ईशान्य भारत आणि काश्मीर. या दोन्हीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचं. आजचं सत्र अनुभवायला नक्की या. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !




द्विशतकमहोत्सवाची काही क्षणचित्रे :









Thursday, December 1, 2022

सत्र १९९ : चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी : प्रकाश चांदे (प्रकट मुलाखत)

०१।१२।२०२२

सत्र १९९ वे:

पुस्तक : चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी

सादरकर्ते : प्रकाश चांदे (प्रकट मुलाखत)

मुलाखतकार : मुकुंद करकरे



आजचं सत्र नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळं. बॉलीवूड आणि एकंदरच चित्रपटसृष्टी च्या संदर्भात लख-लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया सारखं गाणं आपल्या मनात रुंजी घालत असतंच आणि त्यांच्या सृजनात्मक दुनियेतल्या - या चंदेरी दुनियेतल्या किस्से  आणि कहाण्या ऐकण्यामध्ये आपल्याला रस असतो. ही सगळी सृजनशील मंडळी, कसा विचार करतात, कसं जगतात याचं कुतूहल सुद्धा असतं. या संबंधित रंजक किस्से आणि कहाण्या ऐकण्यासाठी आजचे शब्दांगण मजेदार ठरेल. आजचं सत्र सादरीकरण म्हणून फॉरमॅटच्या दृष्टीने सुद्धा वेगळे ....

'चंदेरी सृष्टी - सोनेरी गोष्टी' या पुस्तकाचे लेखक प्रकाश चांदे यांची मुलाखत चोखंदळ रसिक वाचक मुकुंद करकरे घेणार आहेत. करमणूक प्रधान आणि सृजनशील अशा चंदेरी दुनियेची ही सफर प्रत्यक्ष नक्की अनुभवा..!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...