३/१०/२०१९
सत्र ३९ - सौ. मंगला चौधरी
पुस्तक - गोष्टी माणसांच्यालेखिका - सुधा मूर्ती
सुधा मूर्ती! संपत्तीच्या भौतिक सोयीसुविधांच्या, सामाजिक प्रतिष्ठेच्या उत्तुंग शिखरावर प्रतिष्ठित असताना सुद्धा, त्यांनी जपलेला साधेपणा आपल्याला सहज भावून जातो. अत्यंत सोप्या शब्दात लिहिलेल्या त्यांच्या गोष्टी, गोष्टी किंवा कथा कसल्या, अनुभवच म्हणा ना, आपल्या मनाचा ठाव घेत जातात. इंग्रजीतलं अस्सल भारतीय लिखाण असा त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. आपण काही मूल्य शिकवीत आहोत असा बडेजाव न आणता सुद्धा नकळत त्या मूल्य व्यवस्थांना प्रस्थापित करत जातात. एखाद्या पुस्तकाच्या मागे जीवनभर केलेलं कार्य उभं असलं कि त्याला जणू गीतेचं स्वरूप प्राप्त होतं. सुधा मूर्तींच्या पुस्तकांमधला सहज सात्विक भाव आपल्या मनाला सुद्धा व्यापून टाकतो. एरवीसुद्धा, आजचं शब्दांगण मांडणाऱ्या मंगला चौधरी, असा सात्विक भाव जगताना दिसतात. साहजिकच त्यांच्याकडून सुधा मूर्तींना ऐकणं म्हणजे दुग्ध शर्करा योग !

No comments:
Post a Comment