३०-०७-२०२०
सत्र ८२ - गणेश कुलकर्णी
विषय - महात्मा गांधी आणि रेल्वे
गांधी नावाच्या अवलियाने 20 वे शतक भारून टाकले होते. चार्ली चॅप्लिन सारख्या विनोदवीरापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत आणि सामान्य माणसापासून ते वैज्ञानिकांपर्यंत अनेकांना एकाच वेळी गारुड घालणारं हे व्यक्तिमत्व. अनेकांच्या मते जगासमोरच्या प्रश्नांची सहज उकल करणारं आणि अनेकांच्या मते भारतासमोर गंभीर प्रश्न उपस्थित करणारं असं हे वादग्रस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या मृत्यूनंतर 70 वर्षानंतर सुद्धा त्यांचा relevance संपलेला नाही.
त्यांच्या व्यक्तित्वातला एक अत्यंत वेगळाच पैलू आजच्या शब्दांगण मध्ये मांडला जातोय. महात्मा गांधी आणि रेल्वे. तुम्ही गांधींचे भक्त असा किंवा गांधी विरोधक. गणेश कुलकर्णी यांच्या शब्दांगणच्या आजच्या सत्रातून मांडले जाणारे गांधी हे unheard असण्याची शक्यता अधिक आणि त्यात, मांडणारा ही किस्से सांगून गप्पांच्या मैफिली रंगवणारा !
काही लोक गिफ्टेड असतात. अनेक क्षेत्रात त्यांना गती असते, रस असतो. निसर्ग वाचनापासून संगीतापर्यंत अनेकविध गोष्टीत जाणकार असलेले गणेश कुलकर्णी शब्दांगण चं हे सत्र घेतायंत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment