Wednesday, December 8, 2021

सत्र ५८ - श्री. वासुदेव कोल्हटकर - भारतीय कालमापन पद्धती

१३/२/२०२० 

सत्र ५८- श्री. वासुदेव कोल्हटकर 

विषय - भारतीय कालमापन पद्धती 

कुठल्याही संस्कृतीच्या दृष्टीने कालमापन हा वैशिष्ट्याचा विषय. किंबहुना काल गणना हा त्या त्या संस्कृतीच्या तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीचा मापदंड सुद्धा. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय खगोलशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांनी स्वतंत्र भारताने ग्रेगेरिअन कॅलेंडर (म्हणजे आपण सध्या प्रचलित आहे ते ) सोडून नवीन भारतीय कॅलेंडर / दिनदर्शिका (National Solar Calendar) वापरावी असे मत मांडले होते. आणि तत्कालीन भारत सरकार ने त्यास स्वीकृती सुद्धा दिली. भारत सरकारचे अधिकृत कॅलेंडर हे राष्ट्रीय कॅलेंडर आहे. आपल्यासमोर भारतीय कॅलेंडर म्हणजे पंचांग येते. हे ही अर्थात आपल्या कालगणनेचे एक व्यवच्छेदक लक्षण आहेच. पण या कालगणना कशा आल्या, कशा विकसित झाल्या हा प्रवास उद्बोधक आहे. त्यापार्श्वभूमीवर आपल्या कालगणनेची चिकित्सा आणि महत्व हे पाहणे देखील रंजक ठरेल.  वासुदेवजी एक अत्यंत नम्र परंतु अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. छान बोलतात आणि अभ्यासपूर्ण असा हा  विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी आहे. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...