Saturday, October 1, 2022

सत्र १९० : समर्थव्रती सुनील चिंचोलकर : दिलीप महाजन ( प्रकट मुलाखत)

२९।०९।२०२२

सत्र १९० वे:

पुस्तक : समर्थव्रती सुनील चिंचोलकर

सादरकर्ते : दिलीप महाजन 

मुलाखतकार : जाह्नवी विंझे, शशांक लखोटे

आईकडून मिळालेला अध्यात्मिक वारसा पुढे नेत, प्रापंचिक मायेत गुंतूनही जीवनातील शाश्वत आनंदाच्या शोधार्थ निघालेले सुनील चिंचोलकर हे सिद्धयोगी समर्थ व्रती..

सज्जनगडावर दाखल होत बारा वर्षे केलेली समर्थ सेवेची तपश्चर्या.. सांसारिक जबाबदाऱ्या पेलत व्यवस्थापक म्हणून सांभाळलेला कार्यभार, अध्यात्मिक साधने बरोबरच समर्थ वाड़मयाचा सखोल अभ्यास आणि गड सोडल्यावर निष्ठापुर्वक अवलंबिलेले समर्थसेवेचे असिधारा व्रत..म्हणूनच असंख्य समर्थ भक्तांनी 'समर्थव्रती' ही बिरुदावली त्यांना उत्स्फूर्तपणे बहाल केली.

समर्थभक्तीने भारलेल्या अन् आपल्या भक्तितून असंख्य भक्तांच्या मनात वसलेल्या या आधुनिक काळातील महंताचा जीवनप्रवास आज आपल्या समोर उलगडणार आहेत मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन.. 

गेल्या ३३ वर्षात ४०० हून अधिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या मराठीतील अग्रगण्य प्रकाशन संस्थांमधील मोरया प्रकाशन या संस्थेचे संस्थापक म्हणून दिलीपजी सुपरिचित आहेतच. जन्मापासूनच समर्थ संप्रदायाशी संबंधित असलेल्या दिलीपजींबरोबर आज प्रकट मुलाखतीतून आपण या समर्थ व्रतीचा अनोखा जीवनप्रवास अनुभवणार आहोत!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र १८९ : आजच्या विश्वाचे आर्त - दीपक करंजीकर : विनोद देशपांडे

२२।०९।२०२२

सत्र १८९ वे:

पुस्तक : आजच्या विश्वाचे आर्त

लेखक : दीपक करंजीकर

सादरकर्ते : विनोद देशपांडे


मंडळी आजचं सत्र विशेष आहे! 

आजच्या विश्वाचे आर्त ह्या दीपक करंजीकर ह्यांच्या पुस्तकावर स्वतः विनोद सर सत्र घेत आहेत. 

हे पुस्तक म्हणजे जागतिकीकरण, महासत्तांची युद्धखोरी, युद्धांमागचे अर्थकारण, जगात घडणाऱ्या विविध घटनांमागचे सत्ताकारण, विकसित देशांची दादागिरी या साऱ्यांची मांडणी करणाऱ्या लेखांचा संग्रह. या लिखाणातून लेखकांचे व्यवस्थापन क्षेत्रातील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव, अनेक देशांत कामाचा अनुभव, केलेला प्रवास यांमुळे विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांची असलेली सखोल जाण व्यक्त होते.

मान्यवर साहित्यिक श्री. रंगनाथ पठारे यांची आशयगर्भ प्रस्तावना असलेल्या ह्या पुस्तकाचं लिखाण सहज, सोप्या  तरीही शैलीदार भाषेत केलं आहे. आजच्या सत्रात त्याची मांडणी बहुश्रुत, व्यासंगी वाचक असलेले विनोद सर आपल्या खास शैलीत करतील! तेव्हा ऐकायला नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र १८८ : जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार : प्रा. प्रदिप जानकर

१५।०९।२०२२

सत्र १८८ वे:

विषय : जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार

सादरकर्ते : प्रा. प्रदिप जानकर



भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अमीट ठसा आहे. काही व्यक्ती त्यांच्या एकाच  जीवनकाळात असे काही कार्य करून जातात की शतकानुशतकाचा समाजप्रवाह ते बदलून टाकू शकतात. डॉ. आंबेडकर त्यापैकी एक. शिक्षण हा समाजजीवनाचा मूळ आधार बनला पाहीजे यासाठी ते आग्रही होते. शिक्षणातून परिवर्तन होईल यावर त्यांची श्रद्धा सुद्धा होती. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून त्यांचे शिक्षणविषयक विचार आज प्रा. प्रदिप जानकर मांडणार आहेत. 

एका वेगळ्या दृष्टीकोनातून आज आंबेडकरांचा विचार होतोय... नक्की ऐका हे सत्र !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...