Wednesday, December 8, 2021

सत्र ५४- हेरंब ओक- नारायण धारप यांचे साहित्य

१६-०१-२०२०

सत्र ५४- हेरंब ओक 

विषय - नारायण धारप यांचे साहित्य 

साधारणपणे ग्रहण ही मालिका किंवा तुंबाड हा चित्रपट यामुळे मर्यादित ओळख असलेल्या नारायण धारपांच्या १२५ पुस्तकांची लेखनशैली या सत्राच्या निमित्ताने समोर येते. कादंबरी, कथासंग्रह, दीर्घकथा या तीनही लेखनशैलीत मुशाफिरी करताना धारप केवळ भयकथांपाशी सीमित नाहीत हे सत्र ऐकताना कळत जातं. 

टोळधाड, पारंब्यांचे जग, चक्रावल, सुवर्णाचे विश्व, आकाशात तरंगणारा डोळा, विधाता/अ.ब.क., कळला तिरका छेद अशा विज्ञान विषयक लेखनात विज्ञानाचे पदवीधर असलेले धारप परग्रहवासी, समांतर विश्व, कृष्णविवर अशा संकल्पनांचा वापर करत विस्मयकारक रचना करताना दिसतात. 

धारपांच्या लिखाणात समर्थ, महंत, पंत, भगत, जयदेव इ. व्यक्तिरेखा दुष्टशक्तींचा नायनाट करणाऱ्या असतात. काही कथांमध्ये धारपांचे मानसपुत्र सुद्धा दिसतात. भय असो वा विज्ञान धारपांच्या लेखणीने कायमच वाचक वर्गाला गुंगवून ठेवले. 

अशा या धारपांच्या साहित्याचा थोडक्यात धांडोळा या सत्रातून घेण्यात आला आहे. 


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...