Wednesday, December 8, 2021

सत्र ३८ - स्पृहा सातवळेकर - हॅरी ते बोक्या

२६/९/२०१९ 

सत्र ३८ - स्पृहा सातवळेकर

विषय - हॅरी ते बोक्या  

बालसाहित्य हा खरंच लहान मुलांपुरता मर्यादित साहित्य प्रकार आहे का? आपल्यातलं मूल जपतच आपण मोठे होत असतो. आणि आपल्यातल्या मुलाला काही ना काही मार्गानी जिवंत ठेवण्याची संधी शोधीत असतो. मग ते बागेतले खेळ असूदेत किंवा डिस्नेला दिलेली भेट असूदे. बच्चा खेले, बाप भी खेले अशी खेळणी आपल्याला अधिक प्रिय. अगदी खेळण्यांच्या दुकानात देखील विक्रेता ती खेळणी मुलांना कमी आणि आईवडिलांना जास्ती विकत असताना दिसतो. स्वाभाविकच बाल साहित्याचं आपल्या मनावर गारुड असतं. म्हणून हॅरी पॉटर तरुणांना अजूनसुद्धा लुभावतो आणि फास्टर फेणेच्या आठवणींनी काही जण मोहरून जातात. बोक्या सातबंडे हे असेच एक भन्नाट पात्र. आजचा शब्दांगणचा विषय म्हणूनच लक्ष्यवेधक. स्पृहा सातवळेकर आजचा विषय मांडतेय - 'हॅरी पॉटर ते बोक्या'. हा काही प्रवास नाही ना त्यांच्यात स्पर्धा आहे. तो दोन संस्कृतींमधला मोहक फरक आहे. दोन काळानुरूप आणि संस्कृतीनुरूप वेगळ्या अशा बालसाहित्यातील भावलेल्या पुस्तकांबद्दल चर्चा आणि विश्लेषणात्मक दृष्टीने त्यांच्या वेगळेपणाची आणि परिणामांची भावी पिढीकरता असलेली बदलती गरज ह्याबद्दल हे सत्र आहे. त्यावरचं स्पृहाचं भाष्य ऐकण्यासाठी आणि त्या निमित्ताने आपल्यातल्या बालपणाला जपण्यासाठी नक्की ऐका.





No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...