Wednesday, December 8, 2021

सत्र ५२ - श्री. चंद्रशेखर टिळक- मला भावलेले गुलजार

२/१/२०१९ 

सत्र ५२- श्री. चंद्रशेखर टिळक 

लेखक आणि सादरकर्ते - मला भावलेले गुलजार 

क्रिकेटमध्ये सचिन, अभिनयात अमिताभ, मराठी साहित्यात पुलं आणि उर्दू साहित्यात 'गुलजार' म्हटल्यावर आपल्या भावना उचंबळूनच येतात. त्याला वयाची अट नाही. सर्व वयात सर्व लोकांना भुरळ घालणारा गुलजार. 'मेरा कुछ सामान' असेल, किंवा 'तेरी राहों में, बारहा रुक कर, हमने अपना ही इंतेजार किया' असं म्हणणारा ही गुलजारच आणि आता फक्त ३ अब्ज वर्षच राहिलीत पृथ्वीच्या आयुष्याची ... किती उशिरा भेटलीस तू मला अशा अर्थाने आळवणी करणारासुद्धा गुलजारच असू शकतो. दुसऱ्या टोकाला ओंकारा चित्रपटात बिडी जलायले सारख्या आयटम सॉंग मध्ये पण गाणं आवडायला भाग पाडणारा गुलजारच असू शकतो. त्यामुळे आजच्या वर्षपूर्तीच्या सत्रात गुलजारला आठवणे हा ही एक उत्सवच जणू. या उत्सवाचं निमित्तही अफलातून. चन्द्रशेखर टिळक यांच्या 'मला भावलेला गुलजार' या अभिवाचनाचं ! आणि दोन दृष्टीने अनोखं. पहिलं म्हणजे अर्थकारणाच्या रुक्ष आकडेवारीत रमणारी व्यक्ती, त्याच वेळी अत्यंत नाजूक वळणाच्या उर्दू साहित्याच्या चंद्राला गवसणी घालते. व्यक्ती म्हणून आणि साहित्य म्हणून गुलजार यांचा अनुभव घेते आणि तो शब्द बद्ध करते हा ही अनुभवच विलक्षण. दुसरं म्हणजे चन्द्रशेखर टिळक यांच्या सारखा एक अत्यंत extempor - उस्फुर्त वक्ता अभिवाचन कसं करतो हा ही अनुभव घ्यावा असा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...