साहित्ययात्री
शब्दांगण ची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी तर्फे साहित्ययात्री या आगळ्यावेगळ्या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवा आणि प्रौढ गटांमध्ये घेतली गेलेली स्पर्धा वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि वेगवेगळ्या कल्पक फेऱ्यांचा योजनेमुळे उत्तरोत्तर रंगत गेली. मराठी साहित्यातील प्रसिद्ध पुस्तकांना स्पर्श करणारी, विविध लेखकांबद्दलच्या आपल्या ज्ञानाची परीक्षा घेणारी आणि ज्ञानात भर घालणारी, इतकंच काय पुस्तकांची मुखपृष्ठे, अर्पणपत्रिका, प्रकाशन संस्था अशा साहित्यविषयक सर्व बाबींना स्पर्श करणारी ही अनोखी स्पर्धा डोंबिवलीकर रसिकांना तर आवडलीच पण मंत्रालयातील अधिकारी वर्गाने सुद्धा ही स्पर्धा उचलून धरली. डोंबिवलीत संपन्न झालेल्या या स्पर्धेला प्रसिद्ध लेखिका विजया वाड प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या हे स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य !
अशा प्रकारे मराठी भाषा, मराठी साहित्य लुप्त होते आहे का ? असे विचारणाऱ्या या काळात या स्पर्धेच्या माध्यमातून साहित्याचा जागर झाला, होतो आहे आणि पुढेही होत राहील यात शंका नाही.
या स्पर्धेची काही क्षणचित्रे -
No comments:
Post a Comment