Wednesday, December 8, 2021

सत्र १४९ - रेणू गांधी - मराठी साहित्याला नवीन वळण देणारी बंडखोर लेखिका - गौरी देशपांडे

२/१२/२०२१ 

सत्र १४९ - रेणू गांधी 

विषय - मराठी साहित्याला नवीन वळण देणारी बंडखोर लेखिका : गौरी देशपांडे 

काही वेळा वाचक आपल्या पिंडाला मिळत जुळत लेखक निवडतो. एखादा लेखक वाचकाच्या जडणघडणीत एक महत्वाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे त्या लेखकाविषयी बोलताना वाचकांमध्ये / आणि शब्दांगणच्या सत्र सादरकर्त्याच्या दृष्टीकोनातून ते सत्र सहज असेल अशी अपेक्षा निर्माण होते. आजचे सत्र हे अशा संत्रांपैकी एक.        

 नायर वहीद यांची एक कविता आहे:  

'नाही 

असा शब्द आहे 

जो त्यांना राग आणतो 

आणि 

तुला स्वतंत्र करतो ... 

स्त्री- वाद हा मराठी साहित्य विश्वातला एक महत्वाचा बंडखोर प्रकार. गौरी देशपांडे, या बंडखोर साहित्यिकांमधलं एक अग्रगण्य नाव आणि त्यांच्या साहित्याबद्दल बोलणार आहेत रेणू गांधी. बंडखोर लेखिका, आपल्या साहित्यात सातत्याने वेगळ्या भासत आल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातच नव्हे तर त्यांच्या कलाकृतीतसुद्धा बंडखोरी दिसून येते. म्हणूनच गौरी देशपांडे यांच्या विविध पुस्तकांबद्दल आजचं सत्र रंगतदार होईल.   विविध नाते संबंध, स्त्री पुरुष संबंध याविषयी त्यांचे लिखाण लक्ष्यवेधी राहिले आहे. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...