२५/७/२०१९
सत्र ३१- विनोद देशपांडे
पुस्तक- कृष्णकिनारा
लेखिका- अरुणा ढेरे
कुठल्याही संस्कृतीची एक बाह्य ओळख असते आणि एक आंतरिक ओळख असते. एखाद्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सहजपणे भारतीय संस्कृतीची पद्धत म्हणून फुलं देतो. हे बाह्य ओळखीचं एक उदाहरण. एका बाजूला समन्वयवादी असणं, आक्रमक नसणं, चिरंतन मूल्यांचा शोध घेणं आणि ती टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रतिकांचा वापर करणं, अशा अनेक प्रकारे आपल्या संस्कृतीची आंतरिक ओळख पटवून देता येते. कुठल्याही संस्कृतीची सगळ्यात महत्वाची आंतरिक ओळख म्हणजे त्या संस्कृतीतील मानदंड. भारतीय संस्कृतीच्या मूल्यमापनाचे राधा, द्रौपदी आणि कुंती हे असेच तीन मानदंड. शतकानुशतकं कथा काव्यांमधून वेगवेगळ्या स्वरूपात या व्यक्तिरेखा भारतीय संस्कृतीला प्रतिबिंबित करतायंत. संस्कृती मुळातच उदारमतवादी असल्याने या मानदंडांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांना interpret केलंय. इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, दाजी पणशीकर, आणि या शब्दांगण मध्ये ज्या पुस्तकाचा विचार केलेलाआहे त्या अरुणा ढेरे...
या पुस्तकाचा थोडक्यात आढावा विनोद देशपांडे यांनी घेतलेला आहे.
No comments:
Post a Comment