Wednesday, December 8, 2021

सत्र १३३- जाह्नवी विंझे - You can heal your life

२९/७/२०२१ 

सत्र १३३ – जाह्नवी विंझे 

पुस्तक- You can heal your life   

लेखिका - Louise Hay

नमस्कार! शब्दांगण मध्ये काही पुस्तकं आपल्याला पटली म्हणून मांडली जातात. शब्दांगण चं सत्र या अर्थाने खास! भावलं, आवडलं म्हणून आजचं पुस्तक सादर होतंय. शब्दांगणच्या आजच्या सत्रात 'You Can Heal Your Life' या लुइस हे यांच्या पुस्तकावर  जान्हवी विंझे बोलणार आहे. सेल्फ हेल्प बुक्स: स्वतःलाच मदत करणारी पुस्तकं हा पुस्तकांमधल्या एक वेगळाच प्रकार... अत्यंत लोकप्रिय.  या प्रकारातले एक पुस्तक अनेक दिवसांनी आज सादर होतंय. मंडळी, शरीर आणि मन यांचा संबंध आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करत असलं तरी आपल्या शारीरीक आजाराची कारणं ही मानसिक आणि भावनिक असू शकतात हीच गोष्ट आपल्याला बऱ्याचदा पटत नाही.  विविध शारीरिक समस्यांचा  भावनिकतेशी आणि मानसिकतेशी असलेला संबंध आज जान्हवी आपल्यासमोर उलगडेल. जान्हवी स्वतः एक संवेदनशील, तरुण, कवयित्री म्हणून आपल्याला परिचित आहेच. आजच्या सत्राच्या निमित्ताने एका वेगळ्या जान्हवीची आपल्याला नव्याने ओळख होईल. आजच्या सत्रामध्ये या अनोख्या पुस्तकाचा परिचय करून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...