३०-०१-२०२०
सत्र ५६- शशांक कुंभारे
पुस्तक- कोसला
लेखक - भालचंद्र नेमाडे
कुठल्याही साहित्यकृतीचं आयुष्यमान किती असावं? तर ती साहित्य कृती काळाच्या ओघात किती संदर्भपूर्ण वाटते यावर? म्हणूनच रामायण महाभारत यांच्यासारखे ग्रंथ सुद्धा अजूनही मानवी मनाला भुरळ घालतात. त्यातले शस्त्र सामुग्री, घोडे, महाल सगळे आजच्या काळात चमत्कृती म्हणूनच राहिले तरी मानवी भाव भावना मात्र तशाच आदिम आहेत. त्यात निर्माण होणारी वादळं ही सुद्धा तेवढीच ताकदवान आणि समाजमनाला ढवळून काढणारी आहेत. हे आठवण्याचं कारण म्हणजे आजचं शब्दांगणचं ५६ व सत्र. शशांक कुंभारे कोसला या पुस्तकावर बोलणार आहे . एका तिशीच्या आतल्या तरुणाला १९६० च्या दशकात लिहिलेलं कोसला भावतं, शब्दांगण मध्ये मांडावंसं वाटतं यातच या पुस्तकाचं मोठेपण लपलंय.
कोसला - जेव्हा मराठी साहित्य विश्वाला पेंगताना पकडलं -असं वर्णन केलं जाणारं कोसला - तत्कालीन साहित्यकृतींमध्ये आपल्या मांडणीमधून क्रांती घडवून आणणारं कोसला - मृत्युबद्दलच्या आपल्या विवेचनातून वैश्विकतेचा दर्जा गाठणारं कोसला, पांडुरंग सांगवीकरच्या कथनातून जीवनविषयक तत्वज्ञान मांडणारं कोसला. कोसला कादंबरीवर कोसला कादंबरीइतकंच लिहिता येईल असं पुलं म्हणाले होते. या शब्दांगणच्या निमित्ताने त्याचा अनुभव घेण्यासाठी नक्की ऐका.
No comments:
Post a Comment