Saturday, January 22, 2022

सत्र १५६ : Holler for Haller - The Unlikely Underdog : विद्याधर नीलकंठ भिसे

 २०।०१।२०२२

सत्र १५६वे:

विषय: Holler for Haller - The Unlikely Underdog

लेखक: Michael Connelly

सादरकर्ते : विद्याधर नीलकंठ भिसे



मंडळी, सध्याची शब्दांगणची सत्रे म्हणजे चोखंदळ वाचकांनी चोखंदळ वाचकांसाठी सादर केलेली सत्रे आहेत... खूप वेळेस आपल्याला नवीन काहीतरी वाचायचे असते पण काय वाचू हा प्रश्नच पडतो. विशेषतः इंग्रजीतून वाचायचं असेल तर हा प्रश्न अधिकच गहिरा होतो. मागचे सत्र केदार मराठे यांनी घेतले होते. यंदाचे सत्र विद्याधर नीलकंठ भिसे घेतायंत. शब्दांगणच्या या सत्रांच्या माध्यमातून आपल्याला काय वाचायचं हे कळत जातंच आहे, पण ऐकताना सुद्धा या सादरकर्त्यांचा आवाका पाहून अवाक व्हायला होतंय. विषय मांडणीची पद्धती , नवीन पुस्तक अगर पुस्तके आणि वेगळा विषय ऐकायला नक्की या .

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :


Thursday, January 13, 2022

सत्र १५५ : Life 3.0 : Max Tegmark : केदार मराठे

 १३।०१।२०२२

सत्र १५५वे :

पुस्तक : Life 3.0

लेखक: Max Tegmark

सादरकर्ते: केदार मराठे


ए.आय. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना एकविसाव्या शतकावर प्रचंड प्रभाव टाकणारी आहे. काही वर्षांपूर्वी स्वप्नवत वाटणार्‍या Driverless Cars सारख्या अनेक कल्पना ए.आय.‌ने प्रत्यक्षात आणल्या आणि त्याचबरोबर अनेक समीकरणंही बदलली. मग ए.आय. हे मानवापेक्षा बुद्धिमान झालं तर? पुढच्या १००/१००००/१० अब्ज वर्षांत काय घडू शकतं? ए.आय. हे मानव नियंत्रित असेल की मानवी जीवन हेच ए.आय. नियंत्रित असेल? Science Fictionची एक अद्भुत रोलर कोस्टर राईड अनुभवण्याकरिता आणि ए.आय.च्या भविष्यात डोकावून बघण्याकरिता नक्की ऐका आजचं सत्र !

पदार्थविज्ञानाच्या चष्म्यातून ए.आय. ची ओळख ! 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !



Thursday, January 6, 2022

सत्र १५४ : अपरिचित इंदिरा संत : तन्वी अमित

 ०६।०१।२०२२

सत्र १५४वे:

विषय : अपरिचित इंदिरा संत (इंदिरा संत जयंती विशेष)

सादरकर्त्या : तन्वी अमित


नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी.. किंवा पत्र लिही पण नको पाठवूस ...  या कविता ऐकल्या किंवा यांचा विषय जरी निघाला तरी सहजच इंदिरा संत आठवतात.... आजचं सत्र अपरिचित इंदिरा संतांवर तन्वी अमित घेतायत. शब्दांगणचं आजचं सत्र अतिशय खास. एकतर इंदिरा संतांवर - किंबहुना कोणत्याही कवयित्री वर होणारं शब्दांगण मध्ये हे पहिलंच सत्रं आहे. तन्वी अमित यांचं मागचं सत्र आपल्या स्मरणात असेलच. त्यामुळे एका संवेदनशील वक्त्याचं संवेदनशील कवयित्रीवरचं आजचं सत्रं चुकवू नये असेच...     

हे सत्र ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :



सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...