Wednesday, December 8, 2021

सत्र ७० - जान्हवी विंझे - विकिपीडिया मराठी साठी योगदान

०७-०५-२०२०

सत्र ७० - जान्हवी विंझे

विषय - विकिपीडिया मराठी साठी योगदान 

मराठीतून ज्ञानाची उपलब्धता ही काळाची गरज आहे. केवळ भाषेवर प्रेम म्हणून नव्हे तर, डिजिटल भारतात इंग्रजीवर प्रभुत्व नाही म्हणून एक मोठा समाज घटक ज्ञानापासून वंचित राहतोय. समाज म्हणून आपण मराठी ज्ञानभाषा स्वीकारली जायची असेल तर त्यासाठी तशी उपलब्धता हवी. यासाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी आपल्या परीने प्रयत्नरत आहे.  मराठी ही ज्ञानभाषा बनली पाहिजे म्हणून आम्ही ज्ञानबोली प्रकल्पांतर्गत मराठी भाषेतून विकिपीडिया वर माहिती उपलब्ध करून देत आहोत. शासनाचे विश्वकोष, शब्द कोष आहेतच परंतु लोकप्रिय माध्यम म्हणून विकिपीडिया सुद्धा वापरला जातो. त्यावर मराठी भाषेतून ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून हा प्रकल्प कार्य करतो . या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती शब्दांगण च्या या सत्रात देण्यात आली.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...