१०-१०-२०१९
सत्र ४० - श्री. मोहन गोखले
पुस्तक १ - तेलसम्राट
पुस्तक २ - असाध्य ते साध्य
आजचे पहिले पुस्तक म्हणजे मार्क रिच या श्रीमंत आणि वादग्रस्ततेच्या वलयात राहिलेल्या क्रूर तेल सम्राटाचे एका पत्रकाराने लिहिलेले चरित्र! सत्तरीच्या दशकात सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना झालेल्या व्यक्तीबद्दल कुतूहलाचे पदर दूर सारणारं हे पुस्तक. असाध्य ते साध्य हे पुस्तक म्हणजे लेखक लुईस गॉर्डन पग यांची संघर्ष कथा! प्रतिकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणी पोहून विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नौदल वकिलाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. श्री. मोहन गोखले हे स्वतः या दोन्ही पुस्तकांचे अनुवादक आहेत. पुस्तकांच्या अनुवादाच्या जन्माची आणि प्रवासाची कथा खुद्द अनुवादकाच्या मुखातून ऐकताना विशेष मजा येते. नक्की ऐका.


No comments:
Post a Comment