खूप वेळा राष्ट्रीय नेत्यांना बघताना आपल्याला आपल्या डोळ्यांवरचे चष्मे काढता येत नाहीत. आणि नेत्यांना एका विशिष्ट कोंदणात बसवल्या शिवाय आपल्याला चैन सुद्धा पडत नाही. स्वाभाविक प्रत्येक नेता एका विशिष्ट दृष्टीकोनातूनच पाहावा असे आपल्यालाच वाटू लागते. हिमालायएवढ्या या मोठ्या नेत्यांचा साकल्याने अभ्यास करण्याची भूमिका आपल्या इतिहास प्रेमी समाजाने स्वीकारली तर स्वाभाविक आपल्या इतिहासाकडून खूप काही शिकता येईल. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे शब्दांगणचं आजचं सत्रं. मुळात विचारी आणि विश्लेषक असणारा संवेदनशील केतन लोवलेकर आजचं सत्र घेतोय. ते ही अर्थतज्ज्ञ लोकमान्य टिळक या विषयावर. पर्वतेंच्या टिळक - द इकॉनॉमिस्ट या पुस्तकावर. आजच्या सत्राची खास दखल अविनाश धर्माधिकारींनी सुद्धा घेतली आहे. टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने केतन लोवलेकर यांनी आजचा विषय घ्यायचा ठरवलाय. हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
शब्दांगण हा दर गुरुवारी सायंकाळी ८ वाजता होणारा प्रामुख्याने पुस्तक परिचयाचा कार्यक्रम. मराठी, इंग्रजी पुस्तकांचा इथे परिचय करून दिला जातो. ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी या डोंबिवलीस्थित संस्थेतर्फे या सत्रांचे आयोजन केले जाते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन
२५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे: विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन आपलं आयुष्य घडवण्याचं क...
-
शब्दांगण सत्रे नमस्कार, 'शब्दांगण' अंतर्गत आजपर्यंत झालेल्या प्रत्येक सत्राचे तपशील, वक्ता, पुस्तक, सत्राचा व्हिडीओ या सगळ्याची यादी...
-
ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी ही एक नोंदणीकृत बहु उद्देशीय धर्मादाय सामाजिक संस्था आहे. संस्थेची स्थापना २०१८ साली झाली. संस्थेचे मुख्यालय ड...
-
साहित्ययात्री@ मंत्रालय शब्दांगणच्या शतकपूर्ती च्या निमित्ताने ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीने साहित्ययात्री ही मराठी साहित्यावरती अनोखी प...
-
प्रतिक्रिया १) मंडळी, शब्दांगण ला आज तारखेने 2 वर्ष पूर्ण झाली. इवलेसे रोप लावीयेलें दारी.. असं म्हणण्याची पद्धत आहे. अर्थात हा वेलु गगनाव...
No comments:
Post a Comment