साहित्ययात्री@ मंत्रालय
शब्दांगणच्या शतकपूर्ती च्या निमित्ताने ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीने साहित्ययात्री ही मराठी साहित्यावरती अनोखी प्रश्नमंजुषा आयोजित केली होती.
मराठी साहित्यावरती रसिक वाचकांसाठी या धम्माल प्रश्नमंजुषेला छान प्रतिसाद मिळाला. साहित्ययात्री स्पर्धेचे नावीन्य पाहून मंत्रालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमंत्रण दिले आणि २०१९ पासून त्रिमूर्ती प्रांगणात ही स्पर्धा आयोजित करण्याचे भाग्य ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीला लाभले.
काव्य शास्त्र विनोदाने - तब्बल तीन तास रंगलेल्या - या प्रश्नमंजुषेत साहित्याचा जागर झाला..या स्पर्धेची काही क्षणचित्रे
No comments:
Post a Comment