Wednesday, December 8, 2021

सत्र १४६- बालदिन विशेष सत्र

११/१/२०२१ 

सत्र १४६ : बालदिन विशेष सत्र 

सादरकर्ते : बाल वाचक

आजचं शब्दांगण अतिशय खास आहे. खूप वेळेला आपण नुसतं म्हणत असतो नवीन पिढी वाचत नाही... अर्थात शब्दांगण च्या समूहात हे वाक्य अस्थानीच आहे... कारण वर्षभरात ३० -४० पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या आपल्या समूहात कमी नाही...  पण आजचं सत्र बालगोपाल वाचकांचं ... म्हणजे नव्या पिढीच्याही नंतरचं. १ - २ नाही तर तब्बल १९ वाचक मुलं मुली आजच्या सत्रात आपापली पुस्तकं मांडणार आहेत. विषयांचं वैविध्य तर कमाल आहे. काही जणांच्या बाबतीत तर या संवेदनशील वयात त्यांनी ही पुस्तक वाचावीत का असा मला प्रश्न पडला होता. पण त्यांनी ती नुसतीच वाचली नाहीत तर आपल्याला ओळख करून देण्याएवढी आत्मसात करून घेतली आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी तर याच. पण मला खात्री आहे त्यातली काही पुस्तके तरी अशी असणारच आहेत जी  आपण वाचली नाहीयेत. त्या पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी सुद्धा या. कुठल्याही स्पर्धेचे स्वरूप नसताना, बक्षिसाचे आमिष नसताना पण ही मुले पुस्तके मांडणार आहेत. त्याचंही कौतुकच आहे... आपल्या मुला नातवंडांना घेऊन या... वाचन संस्कृतीचा खरा जागर पाहुयात या खालील वर !

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...