०९।१२।२०२१
सत्र १५० अर्थात शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सत्र
विषय : चौकटीबाहेरचा प्रवास : समीक्षण ते दिग्दर्शन
गणेश मतकरी यांची प्रकट मुलाखत
'शब्दांगण' च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सत्राकरिता सर्व रसिक वाचक आणि साहित्यप्रेमींचे हार्दिक स्वागत. येत्या गुरुवारी अर्थात दिनांक ९ डिसेंबर २०२१ रोजी आपण आपल्या 'शब्दांगण' चे एकशे पन्नासावे सत्र आयोजित करत आहोत. या सत्राच्या निमित्ताने आपण एक आगळावेगळा कार्यक्रम घेत आहोत आणि तो म्हणजे चौकटीबाहेरचा सिनेमा, फिल्ममेकर्स, खिडक्या अर्ध्या उघड्या, बटरफ्लाय इफेक्ट अशा समीक्षापर आणि फिक्शन पुस्तकांचे लेखक आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्री गणेश मतकरी यांची प्रकट मुलाखत. समीक्षा, दिग्दर्शन, लेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये लीलया मुशाफिरी करणारे गणेश मतकरी या निमित्ताने आपल्याशी मुक्त संवाद साधणार आहेत.
हे सत्र ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा !
No comments:
Post a Comment