१९-१२-२०१९
सत्र ५० - डॉ. प्राची दामले
विषय - कौटिलीय अर्थशास्त्र
हे शब्दांगण चे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी सत्र. सुरुवातीची काही सत्रे तर करून पाहू, पुस्तकांवर किती आठवडे बोलता येईल आणि किती आठवडे ऐकायला संख्या जमेल? असं म्हणता म्हणता हे ५० वं सत्र झालं. गेल्या पन्नास आठवड्यात विविध क्षेत्रातील आणि विचारपद्धतीच्या मंडळींनी शब्दांगणच्या प्लॅटफॉर्मला उजाळा दिलाय. कवी जितेंद्र पेंढारकर, गज़लकार जयंत कुलकर्णी आणि कवी डॉ. प्रल्हाद देशपांडे यांनी त्यांच्या अनुभवांनी आणि मार्गदर्शनाने शब्दांगणचं भावविश्व समृद्ध केलंय. अनुवादकार मोहन गोखले, आणि डॉ. अजिंक्य नवरे यांनी आपल्या चिंतनांतून या शब्दांगणमध्ये पुस्तकं / ग्रंथ मांडलेत. हा मनोहारी प्रवास असाच सुरु राहील. प्रत्येकच सत्र हे खरंतर विशेष असतं. हे सत्रही विशेषच. पण पन्नासाव्या सत्रासाठी विशेष विषय असावा असं आमच्या मनात होतं. आणि कोणतेही आढेवेढे न घेता डॉ. प्राची दामले 'कौटिलीय अर्थशास्त्र' हा विषय घ्यायला तयार झाल्या. ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीच्या तत्वज्ञानाशी जोडलेला विषय आणि वक्ता. त्यामुळे पन्नासाव्व सत्र या विषयावर होतंय याचा विशेष आनंद. ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीच्या ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटीच्या प्रयासातली ही आमची समिधा.
No comments:
Post a Comment