१८/११/२०२१
सत्र १४७-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे श्रद्धांजली
वक्ते - डॉ. सागर देशपांडे
डॉ. सागर देशपांडे - बाबासाहेब पुरंदरेचे निकटवर्तिय हे सत्र घेत आहेत. सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले आहे. बाबासाहेबांच्या जीवनाचा आणि कार्याचा आढावा या निमित्ताने मांडला गेला आहे. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरें बद्दलच्या आपल्या भावना तीव्र आहेत हे गेल्या दोन - तीन दिवसात दिसून आले आहेच. बऱ्याचदा आपल्याला शिव चरित्र माहित असते , किंवा बाबासाहेबांचा मोठेपणा माहित असतो , परंतु ते कसे घडले, त्यांच्या कार्याचा प्रवास कसा होता हे जाणून घेणे अधिक प्रेरणादायी ठरेल. म्हणूनच तत्कालीन मेसेज फॉरवर्ड करण्यापुरते मर्यादित न राहता आपली श्रद्धांजली वाहण्यासाठी हे सत्र नक्की ऐका. हा आग्रहाचा विषय नाही, कर्तव्याचा विषय आहे.
उरी ध्येयज्वाला असे पेटलेली,
अशांना करी लागते ना मशाली
रवि नित्य तेवे विना तेलवात
अशांची शिवाजी असे जन्मजात!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment