सत्र १२१- मंगेश देशपांडे
विषय - अरविंद गोखले यांच्या कथा
मानवी जीवनाची दुखरी नस, मनोव्यापाराची गुंतागुंत शोधण्याचा प्रयत्न करणारी कथानके, साधी सोपी पण मनाला स्पर्श करणारी भाषा आणि वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून येणारी पात्रे ही अरविंद गोखले यांच्या कथांची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. मंजुळा, कातरवेळ, रिक्ता अशा काही कथांचे रसग्रहण आणि निवडक परिच्छेदांचे अभिवाचन यामुळे हे सत्र श्रोत्यांच्या मनाला भावून गेले. आणि लेखक अरविंद गोखले यांच्या कुटुंबीयांनी सत्राला लावलेली हजेरी आणि वक्त्याला दिलेली दाद यामुळे हे सत्र विशेष ठरले.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment