Saturday, July 16, 2022

सत्र १८१ : पावसावरच्या कविता : तुम्ही,आम्ही, आपण सर्व (शब्दांगण परिवार)

 १४।०७।२०२२

सत्र १८१ वे:

विषय : पावसावरच्या कविता

सादरकर्ते : तुम्ही, आम्ही, आपण सर्व



नेमेचि येतो पावसाळा । हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा ।। 

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे 

गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही..


या आणि अशा अनेक पावसावरच्या कविता म्हणजे काव्यरसिकांसाठी मेजवानीच ! बालकवी, शंकर वैद्य, शांता शेळके, बा. भ. बोरकर, गुलजार अशा कवींपासून ते आजच्या संदीप खरे, वैभव जोशी, नलेश पाटील यांसारख्या कवींना देखील पावसावर कविता करायचा मोह आवरत नाही. अशाच कवींच्या खास पावसावरच्या कवितांनी सजलेलं हे सत्र ! आणि सादरकर्तेही आपण सर्वच...त्यामुळे आपल्याला भावलेल्या कविता सादर करण्याबरोबरच जयंत कुलकर्णी, महेश वझे यांनी स्वरचित पावसावरच्या कविता सादर करुन सत्राची रंगत अजूनच वाढवली.
या काव्यसरींमध्ये भिजून जाण्यासाठी नक्की ऐका हे सत्र !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Friday, July 8, 2022

सत्र १८० : पुरुषोत्तम : तक्षिल खानविलकर, सुमेध समर्थ, मल्हार शितोळे (टीम प्रयोगशाळा)

०७।०७।२०२२

सत्र १८० वे:

विषय : पुरुषोत्तम 

सादरकर्ते : तक्षिल खानविलकर, सुमेध समर्थ, मल्हार शितोळे (टीम प्रयोगशाळा)



मंडळी , 

' आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय तर आणला नाही ना? 

' रत्नागिरीतल्या समस्त म्हशी तूर्तास गाभण का रे झम्प्या? '

' यमीपेक्षा सहापट गोरी '


ही आणि अशी असंख्य वाक्ये आपल्या पैकी अनेकांना आठवत असतात, वेळोवेळी त्यांचे दाखले द्यावेत अशी स्थिती सातत्याने येत असते... पुलंनी अजरामर केलेली ही व्यक्तिचित्रे आपल्यापैकी अनेकांच्या काळजात घर करून आहेत. अर्थात त्यात मुख्य श्रेय त्यांनीच केलेल्या कथाकथनाचे .... अजूनही सर्वच पिढ्यांवर त्यांचे सादरीकरण गारुड करून आहे. पण विनोद हा स्वभावधर्म असलेल्या पुलंचे वैचारिक साहित्य मात्र सगळ्यांना माहित असतेच असे नाही. या साहित्यावर यंदाचं  शब्दांगणचं  सत्र घेणार आहे टीम प्रयोगशाळाची त्रिमूर्ती. पुलंच्या वैचारिक साहित्याची ताकद अफाट आहे, तिचा अनुभव घेण्यासाठी तक्षिल खानविलकर, मल्हार शितोळे, सुमेध समर्थ यांच्या या सत्राला नक्की उपस्थित राहा. 

 आणि सर्वात महत्वाचे : हे सत्र युट्युब वर शब्दांगण सत्राच्या वेळे व्यतिरिक्त पूर्णांशाने उपलब्ध नसेल.

Sunday, July 3, 2022

सत्र १७९ : आज्ञापत्रांचे अंतरंग : डॉ. प्राची दामले

३०।०६।२०२२

सत्र १७९ वे:

विषय : आज्ञापत्रांचे अंतरंग

सादरकर्त्या : डॉ. प्राची दामले


'आज्ञापत्रांचे अंतरंग' यावर शब्दांगणचं सत्र आज डॉ. प्राची दामले घेतायत. या सत्रासाठी आजच्या पेक्षा अधिक योग्य दिवस मिळाला असता का? असा प्रश्न आपल्याला पडावा. राज्यकर्त्यांची कर्तव्ये आणि सूक्ष्म विचार यातून सहज अधोरेखित व्हावीत. मंडळी, महाराष्ट्र इतिहासावर आत्यंतिक प्रेम करतो, त्यातून योग्य ते धडे घेतो का हा खरे तर प्रश्नच. आज्ञापत्रांचे अंतरंग मधून एक आदर्श राज्यकर्ता समोर येतो एव्हढेच नव्हे तर तत्कालीन समाज जीवनावर  सुद्धा त्यातून प्रकाश पडतो. आजचे सत्र चुकवू नये असेच. आज पाऊस आहेच परंतु खऱ्या रसिक श्रोत्याला पाऊस आडवा येत नाही. आणि मुंबईकराला तर नाहीच नाही. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...