१९ सप्टेंबर २०१९
सत्र ३७- हेरंब ओक
विषय - कादंबऱ्यांमधून दिसणारा डॅन ब्राऊनडॅन ब्राऊनच्या कादंबऱ्यांमधून प्राचीन इतिहास, चिन्ह, खुणा, प्राचीन संस्कृती आणि नागरी वसाहती, भुयारं, तळघरं, इमारती आणि या सगळ्यांत दडलेली अनेकानेक प्राचीन गूढ रहस्य आणि या सर्वांची आपल्या अजोड बुद्धिमत्ता आणि अनुभवाने लीलया उकल करणारा कथानायक रॉबर्ट लँग्डन या सर्वांची भेट होते. रॉबर्ट लँग्डन हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारा गूढचिन्ह/लिपी यांचा अभ्यासक आहे. त्याच्या जोडीला प्रत्येक पुस्तकात एक नवीन नायिका आहे. डॅन ब्राऊन च्या पुस्तकांची वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या प्रत्येक कादंबरीतलं कथानक हे २४ तासांच्या कालावधीत घडतं आणि कथा ज्या स्थळी घडते ते स्थळ ऐतिहासिक दृष्ट्या जागतिक वारसा असलेलं प्राचीन वस्तू असते.


No comments:
Post a Comment