Wednesday, December 8, 2021

सत्र ११२- चारूमित्रा रानडे - एक शाम साहिर के नाम

११-०३-२०२१
सत्र ११२ - चारुमित्रा रानडे
विषय - एक शाम साहिर के नाम
साहिर लुधियानवी यांच्या गीतांचा रसास्वाद 


अभि ना जाओ छोडकर किंवा कभी कभी मेरे दिल में ये खयाल आता हैं अशी आपल्याला घायाळ करणारी -  हळवी गाणी लिहिणारा शायर जला दो इसे फुक डालो ये दुनिया असं सुद्धा लिहून जातो. आणि जिन्हें नाझ हैं हिंद पार वो कहाँ  हैं  असा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारून जातो.. 

चित्रपटांसाठी लिहिताना सुद्धा त्याची लेखणी साहित्याशी बेईमानी करत नाही. ती तिचा अस्सलपणा टिकवून ठेवते. केवळ जुन्या नव्हे तर नव्या पिढीच्या तोंडावर सुद्धा त्याची गाणी सारखीच रेंगाळत राहतात. साहिर लुधियानवी ! 

नुकतीच ८ मार्च ला त्याची जन्मशताब्दी साजरी झाली. त्या निमित्ताने शब्दांगणचं आजचं सत्र. डॉ. चारुमित्रा रानडे घेतायत. केवळ आपल्या व्यावसायिक कार्यासाठी नव्हे तर चित्रपट संगीत, साहित्य यातील आपल्या जाणकारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. चारूमित्रा रानडे! साहिरच्या शायरीने अनेकांना अक्षरशः भारावून टाकलं. डॉक्टर त्यातल्याच एक ! सत्र नक्की ऐकावं असंच ! 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...