Wednesday, December 8, 2021

सत्र १४८ - विवेकानंद केंद्र प्रकाशन विभाग- साठ वर्षांची वाटचाल- सुधीर जोगळेकर

२५/११/२०२१ 

सत्र १४८ – विवेकानंद केंद्र  प्रकाशन विभाग- साठ वर्षांची वाटचाल

वक्ते - सुधीर जोगळेकर 


पुस्तके चरित्र घडवतात हे आपल्याला नवीन नाहीच. विवेकानंद केंद्र ही आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी संघटना. केंद्राची पुस्तके भाषा म्हणून सुद्धा सोपी आणि खिशाला परवडणारी अशी. त्यामुळे केंद्राच्या पुस्तकांचे आम्हा कार्यकर्त्यांच्या जीवनात अविभाज्य स्थान होते. माधवी जोशींच्या घरी जाऊन पुस्तके घेऊन येत असू मित्र मंडळींचे वाढदिवस त्यावर साजरा होत असत. कधी या पुस्तकांवर चर्चा होत असे आणि कधी विषय मांडणी. आमच्या संवेदनशील मनांवर  विवेकानंद, एकनाथजी रानडे ठसा उमटवू शकले त्यात केंद्राच्या पुस्तकांचा मोठा हात आहे. म्हणूनच जेव्हा आज सुधीर जोगळेकर विवेकानंद केंद्र प्रकाशनाची ६० वर्षे असा विषय मांडतो म्हणाले तेव्हा आनंदच झाला. अर्थात ५० वर्षांच्या केंद्राच्या प्रकाशनाची साठ वर्षे मात्र कशी काय असा प्रश्न आहेच, त्यामुळे सत्राची उत्सुकता अजूनच लागून राहिली आहे. डोंबिवलीतल्या एखाद्या चांगल्या उपक्रमात सुधीरजींचा सहभाग नाही असं क्वचितच झालं असेल. अनेक संस्थांचे , कार्यकर्त्यांचे सुधीरजी आधारस्तंभ आणि मार्गदर्शक राहीले आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांना ऐकण्याचीही उत्सुकता आहेच, तुम्ही सुद्धा ही संधी दवडू नका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...