२३/९/२०२१
सत्र १४० – डॉ.नरेंद्र जोशी 🎤
विषय - प्राचीन भारतीय आर्थिक विचारआजचे शब्दांगण अतिशय खास! 'प्राचीन भारतीय अर्थविचार' या विषयावर डॉ. नरेंद्र जोशी आजचं शब्दांगणचं सत्र घेतायत! पाश्चिमात्य अर्थविचार हा तुकड्या - तुकड्यांमध्ये विचार करतो पण भारतीय अर्थविचार मुळात समग्रतेला मानणारा. खरंतर अर्थविचार म्हणताना सुद्धा त्याला तुकड्यातच पाहत आहोत. भारतीय विचारात आर्थिक सामाजिक राजकीय कला असे तुकडे मुळात नाहीतच. त्यात समग्रता आहे. ही समग्रता समजून घेण्यासाठी वक्ता ही तितकाच समर्थ. उच्च विद्याविभूषित असूनही अत्यंत रुजू आणि संयत स्वभावाचे ईशान्य भारतात प्रचारक म्हणून कार्य केलेले सध्या विवेकानंद प्रबोधिनीचे काम करणारे डॉ. नरेंद्र जोशी आजचं सत्र घेतायत. ज्ञानवंत आणि कर्मयोगी असा मिलाफ कमी वेळा पाहायला मिळतो. हा विषय ऐकण्याची संधी गमावू नका! आजचे शब्दांगण नक्की ऐका खालील लिंकवर
No comments:
Post a Comment