२७।०२।२०२२
मराठी भाषा गौरव दिन विशेष
सत्र १६२वे:
विषय: काव्यांजली (कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे अभिवाचन)
सादरकर्ते : शब्दांगण परिवार
कोणतीही कला बोधक असावी की मोदक? हा प्रश्न आपल्या संस्कृतीने केव्हाच सोडवलाय. कलेचा प्रमुख उद्देश बोधक असावा हे आपल्या मातीत रुजलेल्या साहित्याला वेगळे सांगावे लागत नाही. सध्या जेव्हा आपल्या घरातली मुले बाळे किंवा तरुण पिढी पाश्चिमात्य भाषांतील साहित्य वाचत असते तेव्हा ते मुख्यतः बोधक कडून मोदक साहित्याकडे वळत असतात. अर्थात हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणाचा प्रश्न आहे हे मान्य केले तरी कुसुमाग्रजांसारखे फार थोडे बोधक साहित्याबरोबर मोदक साहित्य लिलया निर्माण करत जातात. त्यांच्या कल्पना शक्तीने आणि त्यात दडलेल्या अथांगतेने आपण थक्क होऊन जातो. म्हणूनच मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.
त्या निमित्ताने आपण आज कुसुमाग्रजांच्या कविता आपल्या काव्यांजली कार्यक्रमात सादर करणार आहोत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: