Wednesday, December 8, 2021

सत्र ३४- सिद्धी जाधव - समृद्धीचा साक्षात्कार- प्रदीप पवार

२२/८/२०१९ 

सत्र ३४- सिद्धी जाधव 

पुस्तक- समृद्धीचा साक्षात्कार 

लेखक- प्रदीप पवार 



प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन सुखी असण्याची कामना करत असते. एक उत्तम समृद्ध आयुष्य जगावं यासाठी प्रयत्नशील असते. समृद्ध आयुष्य जगता येणं हा चमत्कार नव्हे आणि अपघात तर त्याहूनही नव्हे. निश्चित पद्धतीने विचार प्रक्रिया विकसित केली तर एक समृद्ध आयुष्यं  जगता येऊ शकतं. आपले विचार आपल्या शरीरावर कसा प्रभाव टाकतात हे जाणून घेणं हे जेवढं उद्बोधक, आवश्यक, तेव्हढंच मनोरंजक सुद्धा.  तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं वामनराव पै सहजपणे म्हणून जातात. आपल्यापैकी प्रत्येकाने हा मार्ग शोधायला हवा, कसा शोधायचा याचा मार्ग सापडला तर जीवनात सुवर्ण क्रांती होऊ शकेल. ही क्रांती कशी घडवून आणता येईल या बद्दल सिद्धी जाधव बोलणार आहे. तिचं हे पहिलंच सत्रं. शब्दांगण मध्ये पहिल्यांदाच स्वयंसहाय्यता प्रकारचे (gener) पुस्तक मांडले गेले. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...