Wednesday, December 8, 2021

सत्र १०२ - चैतन्य जोशी - तीन महानायक आणि देव संकल्पना

२४- १२- २०२०
सत्र १०२ - चैतन्य जोशी
विषय - तीन महानायक आणि देव संकल्पना. महात्मा गांधी, भगत सिंग आणि सावरकर यांचे परमेश्वर विषयक विचार 

राष्ट्रनिर्मितीच्या काळात अनेक प्रश्नांवर उहापोह झाला. मग त्यातून खुद्द देव तरी कसा सुटेल? अगदी देवाचाही पाठपुरावा करत हुतात्मा भगतसिंह, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देवाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाविषयी मोलाचा वाटा दिला. भगतसिंहांनी "Why I am an Atheist" निबंधातून आस्तिक समाजाच्या संसदेत बॉम्ब फोडला. तर दुसरीकडे महात्मा गांधींनी "My God" मधून आपल्या आस्तिकतेची ग्वाही देऊन सत्याला आपला देव मानले. सावरकरांनी त्यांच्या निबंधात तर देवाचे "मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव" वर्गीकरण करून समाजाच्या डोळ्यात विज्ञाननिष्ठ अंजन घातले. याविषयी ऐकूया या सत्रामध्ये !
 


हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...