Wednesday, July 5, 2023

सत्र २२९ : कथा साहसवीराची - फास्टर फेणे : शौनक पिंपुटकर

२९।०६।२०२३

सत्र २२९वे:

विषय : कथा साहसवीराची - फास्टर फेणे

सादरकर्ते : शौनक पिंपुटकर



नमस्कार !
तुम्हाला सर्वांना आजच्या आषाढी एकादशीनिमित्ताने शुभेच्छा !
कसं आहे, बदलत्या काळानुरुप जसे सिनेनायक-नायिका बदलतात तसेच त्या त्या काळातील, कथांमधील साहसवीर/नायकही. काल गोट्या-चिंगीची पुस्तके वाचणाऱ्या पिढीच्या नातवंडांना बोक्या-चिंटू-हॕरी पाॕटर हे किंडल नि इ-बुकवर वाचायला आवडू लागलेत.पण त्यांच्या पालकांना त्यांचा हिरो कोण होता विचारले तर ते निःसंशयपणे म्हणतील - *ट्टाॕक!* ... हां...! म्हणजे *फाफे म्हणजे फास्टर फेणे, म्हणजेच बन्या उर्फ बनेश फेणे !*

मराठी बाल-कुमारसाहित्यात व बाल-कुमारवाचकांत एक अढळपद प्राप्त केलेला नायक म्हणजे फा.फे.
पुस्तके , दूरदर्शन-मालिका, चित्रपट, किंडल, इ-बुक असा सगळा प्रवास केल्यानंतरही पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटत राहणारा फाफे.
फाफे म्हटल्यावर काय आठवतं ?
आठवते...
*फाफे म्हणजे तो चौकड्यांचा शर्ट, वाळकुड्या तंगड्या, कुठूनही कितीही उंचावरून उडी मारणे, भन्नाट वेगाने सायकलिंग, धावपळ हे व असल्या अनेकानेक बारीकसारीक गंमतीजमती ..शिवाय, संकटमालिका नि त्यावर युक्तीप्रयुक्तीने मात ...*

अश्या सगळ्या सगळ्या करामती वाचून बालवाचकांचे मन रमले नसते तरच नवल!
थोडक्यात, वाचकांच्या दृष्टीने बोलायचे तर, वाचनाच्या रस्त्यावरचे, मोक्याचे वळण म्हणजे *फास्टर फेणे!* जे एकदा मागे पडले तरी पुन्हा पुन्हा तिथे जावेसे वाटतेच वाटते..!

चला तर मग येताय ना ? आजच्या शब्दांगणच्या सत्राला. सादर करतोय आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांवर/विषयांवर सत्रे घेतलेला विविधांगी वाचनात रस असलेला *हॕरी पाॕटर- चिंटू- बोक्याच्या* जमान्यातही चक्क फाफे वाचणारा एक युवा वाचक- *शौनक पिंपुटकर.*

फास्टर फेणे हा ८० - ९० च्या दशकातल्या किशोरवयीन मुला- मुलींचा चा हिरो... नैतिक साहसाने आणि आदर्शवादाने भरलेला आणि भारलेला. शब्दांगणच्या आजच्या सत्राचं वैशिष्ट्य हे की ते मुलांबरोबर ऐकावं आणि नंतर त्यावर गप्पा ही माराव्या .... त्यानिमित्ताने तुमचं बालपण ज्या ज्या गोष्टींनी रंगवलं त्या त्या गोष्टींना उजाळा द्या. ते दिवस पुन्हा आठवण्यासाठी आजचं सत्र नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २२८ : Climate Change : सृष्टी गायकवाड,संजीवनी खापरे

२२।०६।२०२३

सत्र २२८वे:

विषय : Climate Change

सादरकर्त्या : सृष्टी गायकवाड, संजीवनी खापरे



गेले किमान २ आठवडे पाऊस आपल्याला हुलकावणी देतोय... आपण काय करणार? तर पहिली पावसाची सर आली की विसरून जाणार. अजून दोन महिन्यांनी सण येतील.... परत एक गट पर्यावरण पूरक सणांवर भर देणार आणि इतर लोक चर्चा करणार हिंदू धर्माच्याच सणांच्या चालीरीतींवर आक्षेप का? सण संपले की परत पुढल्या ट्रिगर पर्यंत आपण थांबू... काही काही प्रश्नांची व्याप्ती खुप मोठी आहे. पर्यावरणात होणारे बदल त्यातला एक अतिशय गंभीर प्रश्न. इतका - की त्यातून करोडो लोकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न गंभीर पणे उभा राहिलाय ... त्यांचे परिणाम सर्वव्यापी आणि दूरगामी आहेत. त्यावर केवळ आपणच नव्हे तर जग एकत्र येऊन प्रयत्न करतंय. आज या प्रश्नावर शब्दांगण चं सत्र घेतायेत ध्रुवच्याच दोन विद्यार्थिनी. *संजीवनी खापरे आणि सृष्टी गायकवाड* . अतिशय गांभीर्याने त्यांनी तयारी केली आहे. या प्रश्नांची जाणीव करून घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आजचं सत्र नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



सत्र २२७ : शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य : प्रशांत रावदेव

१५।०६।२०२३

सत्र २२७वे:

विषय : शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य

सादरकर्ते : प्रशांत रावदेव



शिवराज्याभिषेक ही जगाला प्रेरणादायी घटना. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या पार अफगाणिस्तान पासून ते आसाम पर्यंत आणि खाली दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या साम्राज्याच्या नाकावर टिच्चून, आदिलशाहीला न जुमानता महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ही साधीसुधी घटना नव्हती. संपूर्ण अरब प्रांताचे २०० वर्षात इस्लामीकरण झाले होते. भारत मात्र मुघलशाहीला पुरून उरला. आपलं स्वत्व हिंदूंनी महाराजांच्या रूपात टिकवून ठेवलं की उलट म्हणावं? महाराजांनी हिंदुत्व आणि स्वत्व टिकवून ठेवलं. अगर शिवाजी न होते, सुन्नत होती सबकी!
शिवराज्याभिषेक ही म्हणून एक प्रेरणादायी घटना...
अभक्तांचा क्षयो झाला .... आनंदवन भुवनी!

 *शिवराज्याभिषेकाला ३५०* वर्षे यंदा पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने *इतिहास संकलन समितीचे श्री. प्रशांत रावदेव* आजचं सत्र घेणार आहेत. नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...