१२-०३-२०२०
सत्र ६२: श्रीमती मंगलाताई ओक
विषय- दुर्गाबाई भागवत: व्यक्ती परिचय आणि साहित्य
शब्दांगणचं आजचं सत्र क्रमांक ६२. आजचं वैशिष्ठ्य म्हणजे मंगलाताई आजचं सत्रं घेणारेत. मंगलाताई म्हणजे एक तरुण व्यक्तिमत्वं. या वयातही त्यांचा उत्साह तुम्हा आम्हाला लाजवण्यासारख्या. स्वतः अत्यंत बहुश्रुत असूनसुद्धा ध्रुवचे तरुण विद्यार्थी काय मांडतात हे अत्यंत उत्साहाने आणि ममतेने ऐकणाऱ्या मंगलाताई या सत्रामध्ये स्वतः विषय मांडत आहेत. आणि तो ही दुर्गाबाई भागवत यांच्या साहित्यावर. हा अर्थातच दुग्धशर्करा योग. दुर्गाबाईंचे साहित्य हे मुळात बहुअंगी आणि भारतीय संस्कृतीच्या मुळापर्यंत जाणारे. व्यासपर्व, पैस अशी पुस्तके आणि त्यांचे निबंध अनेक अंगाने वाचकांना समृद्ध करत जातात. त्याही दृष्टीने दुर्गाबाईंचं वाङ्मय समजून घेण्यासाठी हे सत्र नक्की ऐका !
No comments:
Post a Comment