३०।१२।२०२१
सत्र १५३ :
पुस्तक : सुखाचा शोध
लेखक : वि.स.खांडेकर
सादरकर्ते : मुकुल आव्हाड
सुखाचा शोध हा आपल्या पैकी प्रत्येकाच्याच जीवनाचा उद्देश. आपल्यापैकी कोणीच 'मी सुखाच्या शोधात नाही' असे म्हणणार नाही. पण सुखाची कल्पना व्यक्ती सापेक्षच नाही का? गांधी म्हणतात जेव्हा विचार, वाचा आणि कृती एकरूप आहे तेव्हा सुखी होण्याचा मार्ग मिळालाच म्हणून समजा. भारतीय संस्कृतीत सुखाची कल्पना ही समाजापासून अलिप्त नाही आणि भोगवादाची तर नाहीच नाही. बा. भ. बोरकर सहजपणे म्हणतात
मार्क्सचा मज अर्थ हवा अन फ्रॉईडाचा काम हवा
या असुरांना राबविण्यापरी गांधींचा मज राम हवा ...
भारतीय सुखाची संकल्पना ही समाजाच्या अधीन आहे... सध्या समाजामध्ये चालू असलेल्या संघर्षाचे मूळ खरंतर सुखाच्या शोधाच्या कल्पनेत आहे.
खांडेकरांनी लिहिलेल्या 'सुखाच्या शोध' या कादंबरीचा परिचय करून देणार आहे मुकुल आव्हाड .
मुकुल, शब्दांगण मध्ये आजवर वैचारिक पुस्तके मांडत आलाय. आजच्या युगातला एखादा विशीतला परंतु विचारी तरुण १९३९ साली लिहिल्या गेलेल्या कादंबरीबद्दल बोलतो तेव्हा त्यातून बदलणारी (की शाश्वत असणारी?) मूल्ये दिसून येतात.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment