Wednesday, December 8, 2021

सत्र ५१- श्री. मनीष टिळक - 5 minutes biographies - Dale Carnegie

२६-१२-२०१९

सत्र ५१ - श्री. मनीष टिळक 

पुस्तक - 5 minutes biographies

लेखक - Dale Carnegie 

डेल कार्नेजी हे स्वतः मध्ये प्रगती घडवून आणण्यावर असलेल्या पुस्तकांच्या (self improvement ) लेखकांमध्ये अगदी आघाडीचं नावं. १९५० - ६० च्या दशकात निधन झाल्यानंतरही त्यांच्या पुस्तकांची मोहिनी अजून टिकून आहे एव्हढंच नव्हे तर त्याच्या नावाने अजूनही पब्लिक स्पीकिंग चे वर्ग चालतात हे ही एक आश्चर्यच. ओघवती लिखाण शैली आणि मानवी स्वभावाची अचूक जाण त्यामुळे हा लेखक, प्रेरणादायी लेखक म्हणून नावारुपाला आला.  '५ मिनिट्स बायोग्राफीज' हे त्याचं  ४८ विविध चरित्रांची माहिती देणारं पुस्तक आज शब्दांगण मध्ये सादर होतंय. सादरकर्ते आहेत प्रसाद टिळक. प्रसाद टिळक यांचाही व्यासंग दांडगा. आणि पुस्तकही छानच. मुळात आजच्या गतिमान जीवनशैलीत कुणी आपल्याला ४८ चरित्रांचा अभ्यास सादर केला तर त्याचे स्वागतच होईल. त्यातही ४८ चरित्रांच वाचन करून कुणी सुज्ञ वाचक त्याचाही अर्क काढून देत असेल तर वाचक / विद्यार्थी म्हणून आपण ही संधी सोडू नये..

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...