३१-१०-२०१९
सत्र ४३ - विनोद देशपांडे
पुस्तक - मुक्तिपत्रे
लेखक - डॉ. आनंद नाडकर्णी
माणूस मुळात स्खलनशील असतो... तो चुकू शकतो... त्याचा पाय घसरू शकतो... सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतानाही त्याच्याकडून चुका होऊ शकतात. आणि त्यातूनही मार्ग काढत परत एकदा योग्य मार्गावर आपल्याला यायचंय याचा विचार करत तो प्रयत्न करत राहतो. यावर श्रद्धा असणाऱ्या डॉक्टरांनी लिहिलेलं मुक्तिपत्रे हे पुस्तक. मुक्तिपत्रे हा व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यामधला पत्र संवाद. यात व्यसनात अडकलेल्या तरुणाची घालमेल आणि त्यावरील उत्तरं वाचताना कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलू त्यातून उलगडत जातात. निरोगी - 'कसं जगायचं' हे सहजच शिकविणारं हे पुस्तक.
No comments:
Post a Comment