Saturday, April 1, 2023

सत्र २१६ : बॉर्डरयात्रा : एक अनोखी सफर : जयंत पित्रे

३०।०३।२०२३

सत्र २१६वे:

विषय : बॉर्डरयात्रा : एक अनोखी सफर

सादरकर्ते : जयंत पित्रे




 सीमेवरचा भारत पाहणं हा अनुभव अगदीच खास. त्यात आपले शेजारी अत्यंत सहृदयी असल्यामुळे एक थ्रिल आहे , नैसर्गिक सीमा नसल्याने आणि भूप्रदेश अत्यंत दुर्गम असल्याने असलेली आव्हाने आहेत. आणि यात खऱ्या अर्थाने सामाजिक / राजकीय प्रश्नांचे दर्शन आहे, निसर्गाचे सौंदर्य आहे आणि एक प्रकारची भव्यता सुद्धा आहे.

 या सगळ्याचा अनुभव घेत जयंत पित्रे यांनी भटकंती केलीये. काश्मीर मध्ये हम संस्थेसाठी करीत असलेल्या कार्यामुळे, आपल्या निगर्वी स्वभावामुळे जयंत पित्रे आपल्याला ठाऊक आहेतच. आजचं शब्दांगण चं सत्र 'बॉर्डर यात्रा' या विषयावर ते घेत आहेत. चांगला विषय आणि चांगला वक्ता यांना अनुभवण्यासाठी आजचं सत्र नक्की ऐकायला या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र २१५ : ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास - अमंग द मॉस्क्स - एड हुसेन : हेरंब ओक

२३।०३।२०२३

सत्र २१५वे:

पुस्तक : ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास - अमंग द मॉस्क्स

लेखक : एड हुसेन

सादरकर्ते : हेरंब ओक



आजचं शब्दांगण वेगळं.
हमारे पाच तुम्हारे पच्चीस ... देशाच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे वाढते प्रमाण हा अनेकांच्या दृष्टीने आजचा जहाल प्रश्न , दुसरीकडे ८० % हिंदूंना मुस्लिमांचं काय भय? असा मानणारा एक वर्ग. या पार्श्वभूमीवर इस्लामी देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा इस्लाम काय घडवून आणतंय याचा अभ्यास आपल्याही समाजासाठी आवश्यक. म्हणूनच *ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : एड हुसैन* या लेखकाच्या *अमंग द मॉस्कस्* या पुस्तकावर आजचं सत्र होतंय. विषय स्फोटक आणि विचार करायला प्रवृत्त करणारा. इस्लाम चं मूळ स्वरूप काय हा अतिशय वादाचा मुद्दा. आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील. राजकीय दृष्ट्या आक्रमक इस्लामचा अभ्यास आपल्यासमोर भयावह चित्र आणतो.
हे सत्र हेरंब ओक घेतायत. हेरंब चोखंदळ वाचक आहे. आणि इस्लामचा (अर्थात केवळ इस्लामचा नव्हे) जाणीवपूर्वक अभ्यासक आहे. या संदर्भात भारतीय आणि परकीय लेखकांचे त्याचे वाचन सुद्धा दांडगे आहे. आजचं सत्र खरंच धक्कादायक असेल. ऐकायला जरूर या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २१४ : अनुवाद करताना येणारी भाषिक आव्हाने : पूनम छत्रे

१६।०३।२०२३

सत्र २१४वे:

विषय : अनुवाद करताना येणारी भाषिक आव्हाने

सादरकर्त्या : पूनम छत्रे



नमस्कार लोकहो,

अनुवादक ही एक अशी अद्भुत व्यक्ती असते की जिच्या शाब्दिक/भाषिक कौशल्य आणि ज्ञानामुळे देशोदेशींच्या, विविध भाषांमधल्या पुस्तकांचा आपल्यासारख्या, त्या मूळ भाषेशी किंवा साहित्याशी काही संबंधही नसलेल्या सर्वसामान्य वाचकांना, मूळ पुस्तकाचा वाचनानुभव मिळतो. भाषेचे अडसर गळून पडून आपण बघता बघता मूळ कथेशी एकरूप होऊन जातो.

अनुवादाच्या अशाच अद्भुत जगताची सफर आपल्याला आजच्या शब्दांगणच्या सत्रात घडणार आहे. आजच्या वक्त्या पूनम छत्रे या व्यावसायिक अनुवादक असून अनुवादाच्या क्षेत्रातले त्यांचे किस्से, अनुभव त्या आपल्याला सांगणार आहेत. आणि त्या मूळच्या कथालेखिका असल्याने ते अनुभव निश्चितच अतिशय रसाळ पद्धतीने आपल्यासमोर मांडतील याची खात्री आहेच. तेव्हा आजचं सत्र आवर्जून उपस्थित राहण्यासारखं !! नक्की या. आम्ही वाट बघतोय !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...