Wednesday, December 8, 2021

सत्र १३६ - मनीष टिळक - मिरासदारी

१९/८/२०२१ 

सत्र १३६ – मनीष टिळक 

पुस्तक- मिरासदारी   

लेखक - द.मा.मिरासदार


कोणे एके काळी
मिरासदार नावाच्या लेखकाने समस्त मराठी वाचकांची व्यंकूची शिकवणी घेत त्यांना शिवाजीचे हस्ताक्षर शिकवलं. हे ऐकून काही टीकाकारांनी आजारी पडण्याचा प्रयोग करुन पाहिला पण तो असफल ठरला आणि मिरासदारांच्या लेखनाची नव्याण्णवबादची एक सफर सुरुच राहिली. पुढे विरंगुळा म्हणून चोरी एक प्रकार म्हणून शिकून केलेल्या पहिल्या चोरीसाठी साक्षीदार न मिळाल्याने होऊ न शकलेला पंचनामा हसवता हसवता मनाला स्पर्श करुन गेला. शाळेतल्या समारंभात धडपडणारी मुले ड्रॉइंग मास्तरांच्या तासाला कशी हैराण झाली हे वाचताना विनोदाच्या पावसात न भिजणार्‍या माणसाने खुशाल स्वतःचा जन्म भुताचा असं मानून पुढच्या जन्माचा निरोप यायची वाट बघत एक निवांत झोप घ्यावी.

आपल्या सदाबहार, वैशिष्ट्यपूर्ण शैलीने इतकी वर्षं मराठी रसिकांना आनंद देणार्‍या द मा मिरासदार आणि त्यांच्या मिरासदारी वर आजचं सत्र घेतायत तितक्याच खुमासदार आणि वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्वशैलीसाठी परिचित असलेले मनीष टिळक, हा एक अप्रतिम योगायोगच आहे. त्यामुळे आजच्या रंगतदार सत्राचा आनंद घेण्यासाठी नक्की या

हास्याचे दोन प्रकार मानले जातात . laughing at आणि laughing with. मराठी साहित्यात laughing at पेक्षाही laughing with ला महत्व आहे.  दर्जेदार विनोद हा कुणावर तरी व्यंग करून जन्माला येत नाही . तो विसंगतीतून येतो, परिस्थितीतून येतो आणि अर्थातच पात्रांच्या विक्षिप्तपणामधून सुद्धा निर्माण होतो. आजचं शब्दांगण 'मिरासदारी' या दमांच्या पुस्तकावर होतंय. आणि मनीष टिळक हे सत्र घेतायंत. आजचा लेखक आणि वक्ता दोन्ही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीसाठी लक्षात राहावे असे. मिरासदारांच्या कथांतून एक मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक दिसते ती अनुभवण्यासाठी नक्की ऐका हे सत्र.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...