Wednesday, December 8, 2021

सत्र १२८ - शशांक कुंभारे - Renaissance State

२४/६/२०२१ 

सत्र १२८ – शशांक‌ कुंभारे 

पुस्तक- Renaissance State   

लेखक - गिरीश कुबेर

महाराष्ट्राचा इतिहास, त्यातही शिवकालीन इतिहास हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.  मात्र अनेकदा वाद-प्रतिवाद,आरोप-प्रत्यारोप, सत्य आणि अफवांच्या गदारोळात हा विषय अभ्यासापेक्षा अस्मितेचा होऊन जातो. मग एखाद्या प्रचलित विचारसरणीच्या विरुद्ध जाणारं चित्रण कोणत्याही माध्यमातून झाल्यास त्या कलाकृतीला / साहित्यकृतीला प्रखर विरोध सहन करावा लागतो. अलीकडे अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. याच यादीत नुकतीच भर पडली ती गिरीश कुबेर यांच्या Renaissance State या पुस्तकाची. महाराष्ट्राचा अगदी राष्ट्रकूट कालखंडापासून होत गेलेला प्रवास या पुस्तकात लेखकाने मांडलेला आहे. मात्र यातल्या काही शिवकालीन नोंदींवर अनेक लोकांनी आक्षेप नोंदवला, अगदी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली. परंतु नक्की या पुस्तकाची विषयकक्षा काय, त्यातील आक्षेप घेतल्या गेलेल्या भागाचा संदर्भ काय,त्या संदर्भांची आणि पर्यायाने पुस्तकाची विश्वासार्हता किती असे अनेक प्रश्न या वादाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर या पुस्तकाचा परिचय करून देत आहे शशांक कुंभारे.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...