१९।०१।२०२३
सत्र २०६वे:
विषय : भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका आणि खगोलीय गमतीजमती
सादरकर्ते : अर्चित गोखले
भारताने १९५७ सालापासून स्वीकारलेली राष्ट्रीय सौर दिनदर्शिका हा तसा सर्वसामान्य लोकांसाठी दुर्दैवाने अनोळखी विषय आहे. आज जगभर कालगणनेसाठी ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा वापर सर्वमान्य आहे, मात्र या दिनदर्शिकेला कोणताही खगोलीय आधार नाही. याउलट भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रीय संकल्पनांवर आधारित आहे. मात्र ही दिनदर्शिका म्हणजे भारतीय पंचांग नव्हे, आपले पारंपरिक पंचांगदेखील या दिनदर्शिकेहून भिन्न आहे, मग या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचे नेमके वेगळेपण काय ? ती खगोलशास्त्रावर आधारित आहे म्हणजे नेमके काय ? या दिनदर्शिकेच्या दैनंदिन वापरामधून आपल्याला काय लाभ होतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अर्चित गोखले यांनी सादर केलेल्या या सत्रातून आपल्याला नक्की मिळतील. अत्यंत सोप्या शब्दांत खगोलशास्त्रीय संकल्पना समजावून घेण्यासाठी हे सत्र नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !




