सत्र १२५ - अभिजित घोरपडे
विषय- पावसाळ्याची तयारी :निसर्ग आणि माणूस
मंडळी जून महिना उजाडला की मग “ मान्सून केरळला अमूक अमूक तारखेपर्यंत येणार, यावर्षी सरासरीपेक्षा कमी/जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज" अशा बातम्या येतयेत मग अखेरीस वरूणराजाचे आगमन, हवेत गारवा अशा बातम्या येऊ लागतात . त्यानंतर मग कुठे अतीवृष्टी, कुठी पावसाची दडी तर मुंबईची तुंबई वगैरे बातम्या येतात . मोडकसागर ,तानसा वैतरणा भरून वाहू लागतात , कधी उजनी तर कधी जायकवाडीतील जलसाठा वर्तमानपत्रात झळकतो. सर्वसामान्य छ्त्र्या दुरूस्त करून घेतो, चाकरमानी एखाद्या दिवशी गाड्या बंद झाल्या म्हणून सुट्टीही साजरी करतो आणि नंतर चार महिने रडतखडत प्रवास करतो. शेतकरी यावर्षी तरी पीकपाणी चांगले होईल अशी आशा करत राहतो व राजकारणी नालेसफाई, अपूर्ण धरणे व अनेक योजनांमध्ये मुरलेले पाणी यावर आरडओरड करत एकमेकांवर चिखलफेक करतात . “नेमेची येतो मग पावसाळा”
पण यावर नेमका उपाय काय ? जसा ,मानवी जीवनात जसे पावसाळ्याचे अनन्यसाधारण महत्व आहे तसेच निसर्गासाठी, निसर्गातील प्रत्येक जीवासाठी आहे. निसर्ग आपल्या परीने तयारी करत असतो . मानवाने या परिस्थितीला सामोरे जाताना काय तयारी केली पाहिजे हे सांगण्यासाठीच शब्दांगणचे आजचे सत्र आहे. “ पावसाळ्याची तयारी : निसर्ग आणि माणूस ". आजचे वक्ते आहे पत्रकार ,लेखक श्री. अभिजित घोरपडे. श्री अभिजित घोरपडे यांनी अनेक वर्षे लोकसत्ता वृत्तपत्रात पर्यावरणविषयक लेखन केले आहे व वरिष्ठ सहसंपादक पदाची धुरा सांभाळली आहे. सध्या ते “ भवताल” या हवा, पाणी व पर्यावरण या विषयक मासिकाचे संपादन करतात . “भवताल”च्या माध्यमातून ते पाणीप्रश्न, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपाय व या सर्वांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी कार्य करत आहेत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment