Wednesday, December 8, 2021

सत्र १४१- आम्ही गिर्यारोहक - Beyond Comfort Zone

३०/९/२०२१ 

सत्र १४१ – Beyond Comfort Zone (लद्दाख अनुभव कथन) 

सादरकर्ते - आम्ही गिर्यारोहक



साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची

प्रतिसाद तया देती लेकरे सह्याद्रीची ।

वर्णाया या अनुपम्य भेटीचा सोहळा

जमणार आम्हा गिर्यारोहकांचा मेळा ॥


हिमालय ! प्रत्येक गिर्यारोहकाला हिमालयाची उत्तुंग शिखरं खुणावत असतात. याच सादेला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या काही

गिर्यारोहकांनी नुकतीच खडतर आणि आव्हानात्मक अशा माऊंट युनाम या शिखरावर यशस्वी चढाई केली.  चाकोरीच्या बाहेर जाऊन प्रवास आणि पर्यटन करणं आपल्याला आनंददायी असतं. हिमालयन ट्रेक किंवा मोहिमेला जाणं हे थोडं त्याच्या पुढचं पाऊल, जिथे फक्त फिरण्याची हौस महत्वाची नाही, तर ते कष्ट घेऊन शिखरापर्यंतचा प्रवास करायची क्षमताही असावी लागते. एका ठराविक मर्यादेपर्यंत आपण आपली क्षमता ओळखून असतो, सांभाळून असतो. पण काही आव्हानात्मक अनुभवांतून मात्र आपली क्षमता नव्याने आपल्यालाच सुखद धक्का देते. आपले १४ डोंबिवलीकर 'आम्ही गिर्यारोहक डोंबिवली' ह्या संस्थेमार्फत नुकतेच माऊंट युनाम ह्या शिखरावर beyond comfort zone प्रयत्न करून पोहोचले आहेत. त्यांच्या या अनुभावांच्या चर्चेत समाविष्ट होण्यासाठी, त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आणि हिमालयाच्या उत्तुंग विश्वात जाण्यासाठी या सत्राचे निमंत्रण सर्वांना!


हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...